Donald Trump News: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या स्वत: च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर (Truth Social) पोस्ट केली आहे. त्यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मंगळवारी आपल्याला अटक (Donald Trump Arrest) होऊ शकते, अशी पोस्ट करत ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून स्वतःच माहिती दिली आहे. (Donald Trump claims he will be arrested tuesday Former US President asks supporters to protest latest marathi news)
2016 च्या निवडणुकीपूर्वी एका पोर्न स्टारला (Stormy Daniels) कथितपणे पैसे दिल्याबद्दल (Donald trump hush money case) त्यांना मंगळवारी अटक होण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय. त्यांनी त्यांच्या समर्थकांना निषेध व्यक्त करण्याचं आवाहन केलंय, अशी बातमी अमेरिकन माध्यमातून समोर येत आहे.
मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी (Manhattan District Attorney) यांच्या कार्यालयाकडून त्यांना अटक केली जाईल, अशी गुप्तचर माहिती मिळाली आहे, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. तब्बल 2 वर्षांपूर्वी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गायब झालेले डोनाल्ड ट्रम्प हळूहळू पुन्हा सक्रिय होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन वर्षांनंतर फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी आयएम बॅक असं लिहिलं होतं. अटकेचा दावा, हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय.
Donald Trump said he will be arrested Tuesday. pic.twitter.com/KPkO3CIAvE
— Tracy Beanz (@tracybeanz) March 18, 2023
दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर (US Presidential Election Results) कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर बंदी (Ban on social media handles) घालण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे आता अमेरिकेत राडा होणार की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.