कुत्र्याने मारली गोळी, जखमी मालकाची पोलिसात तक्रार

ट्रिगर सेफ्टी असतानाही कुत्र्याने गोळी चालविल्याची घटना आश्चर्यकारक आहे

Updated: May 14, 2018, 03:07 PM IST
 कुत्र्याने मारली गोळी, जखमी मालकाची पोलिसात तक्रार title=

अमेरिका : ५१ वर्षांच्या माणसाला आपल्या कुत्र्यासोबत खेळणं महागात पडलय. या कारणामुळे त्या हॉस्पीटलमध्ये भरती व्हाव लागलं. अमेरिकेत ही घटना घडली. कुत्र्याने गोळी चालवून जखमी झाल्याची तक्रार एकाने पोलिसांत केली आहे. लोकल मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आयोवा भागात एका व्यक्तिने इमरजन्सी नंबर डायल करुन कुत्र्याने गोळी मारल्याची तक्रार केली. हा व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत होता. फोर्ट ब्रिज येथे राहणाऱ्या रिचर्ड रेम्मे असे या इसमाचे नाव आहे. आपल्या क्रॉस ब्रिड कुत्र्याला खेळायला-धावायला शिकवत होते. यावेळी त्यांच्या कुत्र्याने बंदुकीची सेफ्टी क्लिप खोलली. बेल्ट अशावेळी कुत्र्याला त्याने स्वत:कडे बोलावल्यामुळे कुत्र्याने पुन्हा उडी मारली. त्याचा पाय बंदुकीवर पडला आणि पिस्तुलातुन गोळी बाहेर पडली. त्यानांतर ९११ या इमरंजन्सी नंबरवर त्यांनी कॉल केला. गोळी त्यांच्या पायाला लागली. आनंदाची गोष्ट ही आहे की यामुळे जास्त नुकसान झाल नाही.

आश्चर्यकारक घटना 

ट्रिगर सेफ्टी असतानाही कुत्र्याने गोळी चालविल्याची घटना आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सिटी पोलीस रोजर पोर्टर यांनी सांगितले. अशी घटना याआधी त्यांनी कधी ऐकली नव्हती. कुत्र्याद्वारे गोळी चालविण्याची घटना तुम्ही फक्त अमेरिकतच ऐकू शकता असे अमेरिकेत गन कंट्रोल मोहीम चालविणारी संस्था मॉम्स डिमांड एक्शन फॉर गन सेंसचे संस्थापक शेन वॉट्स यांनी सांगितले.