स्कॉटलंड : जगात अशी अनेक ठिकाणं आणि गोष्टी आहेत, ज्या खूप रहस्यमयी आहेत. या जागांचं गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेलं नाही. अनेक ठिकाणी लोक आत्महत्या करतात. मानसिक तणाव, आर्थिक बळजबरी आणि इतर अनेक कौटुंबिक कारणांमुळे माणसं आत्महत्या करतात, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याने आत्महत्या केल्याचं ऐकलंय का?
जगात अशी एक रहस्यमय जागा आहे, जिथे कुत्रे येऊन आत्महत्या करतात. याठिकाणी एक पूल असून मांजरी या पुलावरून उडी मारून आत्महत्या करतात.
हा रहस्यमयी पुल स्कॉटलंडमध्ये आहे. या पुलाबद्दल कुत्र्यांनी उडी मारून आत्महत्या केल्याचं बोललं जातं. या पुलाची उंची सुमारे 50 फूट असल्याचं सांगण्यात येतंय. या पुलावरून सुमारे 600 कुत्र्यांनी उड्या मारल्या असून त्यापैकी 50 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.
मात्र, या ठिकाणी आल्यानंतर कुत्र्यांनी स्वत: उड्या मारण्याचे कारण काय, याचं गूढ अद्याप उलगडले नाही. अशा घटना वाढल्यानंतर या पुलावर सूचना फलकही लावण्यात आला आहे.
या रहस्यमयी पुलाबद्दल लोकांमध्ये अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. या घटनांमागे भूतांचा हात असल्याचा अनेकांचा विश्वास आहे. या घटनेत भूताचा हात असल्याचा काहींचा समज आहे. व्हाइट लेडी नावाच्या महिलेचं भूत आजही या पुलावर फिरत असल्याचं मानलं जातं.
धार्मिक तज्ज्ञ शिक्षक पॉल ओवेन्स आपला अनुभव सांगतात की, एकदा ते पुलावर उभे राहून खाली पाहत असताना त्याला असं वाटलं की, कोणीतरी मागून बोटाने त्याच्या पाठीला स्पर्श केला. या पुलावरून एका व्यक्तीने आपल्या मुलाला खाली फेकून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आजही हा पूल एक कोडं आहे. त्यामुळे कुत्र्यांनी आत्महत्या केल्याचं रहस्य आजही कायम आहे.