Tsunami Alert : पुन्हा त्सुनामी येणार! थरकाप उडवणाऱ्या भूकंपानंतर 'या' भागावर आणखी मोठं संकट

Tsunami Alert : तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतक्या भयंकर तीव्रतेच्या भूकंपानंतर Solomon Island भागात मंगळवारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Nov 22, 2022, 10:15 AM IST
Tsunami Alert : पुन्हा त्सुनामी येणार! थरकाप उडवणाऱ्या भूकंपानंतर 'या' भागावर आणखी मोठं संकट  title=
disaster big news Tsunami alert after earthquake of magnitude 7 0 jolts Solomon Islands

Tsunami Alert : तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतक्या भयंकर तीव्रतेच्या भूकंपानंतर Solomon Island भागात मंगळवारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. इथं आलेल्या भूकंपामध्ये धरणीला कंपनं जाणवली आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीदायक वातावरण पाहायला मिळालं. या महाभयंकर भूकंपानंतर आता Solomon किनारपट्टी भागात साधारण 300 किलोमीटरपर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला. (disaster big news Tsunami alert after earthquake of magnitude 7 0 jolts Solomon Islands)

भूकंप आला तेव्हा या भागात असणाऱ्या हॉटेल आणि इमारतींमध्ये असणाऱ्या खोल्यांतील सामान कोसळण्यास सुरुवात झाली. साधारण 20 मिनिटं हा भूकंप जाणवला. पण, त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ टीकणारे असल्याचं स्पष्ट झालं. 

वाचा : Indonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे 

दरम्यान, प्राथमिक स्तरावर सतर्कता म्हणून या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण, त्यानंतर मात्र हा इशारा मागे घेण्यात आला. पण, प्रशासन मात्र सध्या सतर्क असल्याचं कळत आहे. भूकंपानंतर सदरील परिसरात विद्युतपुरवठा खंडीत झाल्याचं समजत असून, या भागातील रेडिओ, टेलिव्हीजन सेवाही खंडीत झाली आहे. 

दोनदा जाणवले भूकंपाचे हादरे 

पहिला भूकंप भूगर्भात 15 किमी खोलीवर जाणवला. हे अंतर Malango च्या दक्षिण पश्चिमेला 16 किलोमीटवर होतं. हा हादरा साधारण 7.3 रिश्टर स्केल इतका होता. तर दुसरा हादरा 30 मिनिटांनंतर जाणवला. त्याची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल इतकी होती. 

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x