Knowledge News : i आणि j च्या वर असणाऱ्या 'या' अनुस्वाराला काय म्हणतात? उत्तर कमाल आहे...

Knowledge News : असं म्हणतात की लेखनाचेही काही नियम असतात. मग ती देवनारी भाषा असो किंवा साहेबांची इंग्रजी भाषा असो. तुम्हाला माहितीयेत का हे नियम?   

सायली पाटील | Updated: Sep 18, 2024, 12:14 PM IST
Knowledge News : i आणि j च्या वर असणाऱ्या 'या' अनुस्वाराला काय म्हणतात? उत्तर कमाल आहे... title=
did you know why i j have dot above Knowledge News

Knowledge News : लेखन नियम... एकूनच अगदी शाळेत आल्यासारखं वाटतंय ना? शालेय जीवनात अगदी सुरुवातीलाच या लेखन नियमांची प्राथमिक माहिती देत पुढे जाऊन या नियमांमधील अनेक बारकावे समजावून सांगितले जातात. फक्त देवनागरीच नव्हे, तर इंग्रजी भाषेतही असे काही नियम आहेत, ज्यामुळं या भाषेचंही महत्त्वं वाढतं. 

इंग्रजीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या Small Words i आणि j यांच्या वर लावल्या जाणाऱ्या या अनुस्वाराला काय म्हणतात माहितीये? हा अनुस्वार इंग्रजी लेखन नियमामध्ये 'सुपरस्क्रीप्ट डॉट' किंवा 'टाईटल' म्हणून ओळखला जातो. टाईटल म्हणजे टायनी (लहानसा) आणि लिटिल या शब्दांना मिळून तयार करण्यात आला आहे. लॅटिन शब्द titulus पासून त्याची उत्पत्ती झाली. 

Titulus म्हणजे लेखन किंवा मुद्रणात दिसणारा, लिहिला जाणारा एक लहानसा बिंदू किंवा स्ट्रोक. तुर्कीमध्ये i आणि j वर असणारा हा अनुस्वार डायक्रिटिक नव्हे तर, अक्षराचाच एक अविभाज्य भाग मानला जातो. अनेक भाषांमध्ये जिथं डायक्रिटिक सामान्य स्थितीवर असतो तिथं टाईटल दिसतं.

हेसुद्धा वाचा : सणासुदीच्या दिवसांपूर्वीच सोन्याच्या दरांना झळाळी; 22kt, 24kt साठी आज किती रुपये मोजावे लागतायत?  

i आणि j वर असणारे हे अनुस्वार भेदक चिन्हं असतात. टाईटल अशीच त्यांची ओळख. हस्ताक्षरातून हा बिंदू तयार झाला आणि त्यानंतर लेखनाच्या या सवयीतूनच तो दैनंदिन वापरातही आला. पण, प्रत्यक्षात हा बिंदू किंवा टाईटल इतरही अनेक कारणांनी वापरला जातो. या बिंदूच्या मदतीनं u, m आणि n सारखी मोठ्या स्ट्रोकची अक्षरं वेगळी होतात. 

अनेकदा सवयीचा भाग म्हणून आपण ज्या प्रचलित गोष्टींवर पाऊल ठेवत त्यांचं अनुकरण करत असतो त्यामागची खरी कारणं समोर आली की, थक्कच व्हायला होतं. इथंही अनुस्वारांची ही गोष्ट जाणून असंच वाटतंय ना?