न्यू यॉर्क : दिव्या सूर्यदेवरा या महिलेचं नाव इंटरनेटवर चर्चेत आहे. कारण भारताची दिव्या अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी जनरल मोटर्स (जीएम)ची सीएफओ म्हणजेच चीफ फायनॅन्शियल ऑफिसर झालीय. जनरल मोटर्सने गुरूवारी दिव्याला सीएफओ बनवण्याची घोषणा केली. कंपनीने आपल्या अधिकृत घोषणेत म्हटलं आहे. दिव्या सूर्यदेवरा १ सप्टेंबर २०१८ पासून सीएफओचं काम पाहणार, आणि सीईओ मॅरी बरा यांना रिपोर्ट करेल.
जनरल मोर्टर्सची चेअरपर्सन आणि सीईओ मॅरी बराने देखील ट्वीट करून दिव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे, मला दिव्याला सीएफओ पद मिळण्याच्या शुभेच्छा देतांना आनंद होत आहे, त्यांचा अनुभव आणि नेतृत्व आपल्याला उद्योगात खूप चांगलं यश देईल. तामिळनाडूची राहणारी ३९ वर्षांची दिव्या जुलै २००५ पासून जनरल मोटर्ससोबत काम करीत आहे. या आधी ती कंपनीची कॉर्पोरेट आणि फायनान्सची व्हाईस प्रेसिडेंट होत्या.
२०१३ पासून २०१७ पर्यंत दिव्याने चीफ इन्वेस्टमेंट आणि असेट मॅनेजरचं देखील काम पाहिलं.दिव्याने चेन्नईच्या मद्रास युनिव्हर्सिटीत कॉमर्स बॅचलर आणि मास्टर डिग्री घेतली आहे. यानंतर दिव्याने हार्वर्ड बिझनस स्कूलमधून एमबीए पूर्ण केलं. ती एक चार्टर्ड फायनॅन्शियल अॅनलिस्ट आणि चार्टर्ड अकाऊंटंट आहे.
जनरल मोर्टर्सचे माजी सीईओ चक स्टीवेन्स १ मार्च २०१८ रोजी निवृत्त झाले, यानंतर त्यांनी दिव्याला जागा दिली. हे एक प्रकारे फार अतुलनीय आहे कारण, एका नामवंत कार कंपनीच्या सीईओ आणि सीएफओ महिला आहेत. प्रसिद्ध बिझनेस पत्रिका फोर्ब्सने आपल्या लेखात दिव्या सीएफओ होणे, म्हणजे एक मोठी सुरूवात असल्याचं म्हटलं आहे.