नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ अचानक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
माजी पाकिस्तानी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी कोर्टानं मुशर्रफ यांना फरार घोषित केलंय. पण प्रत्यक्षात 'फरार' मुशर्रफ पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांना मुलाखतीत देत फिरतायत.
एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या भारतीय सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओ ते माजी राष्ट्रपती आणि लष्करशाह मुशर्रफ यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम अजूनही पाकिस्तानात असल्याचं कबूल केलंय.
मुशर्रफ यांच्या या मुलाखतीमुळे भारताच्या दाव्याला आणखी मोठा आधार मिळालाय. शिवाय पाकिस्तानाचा खोटारडेपणाही पुन्हा एकदा सिद्ध झालाय.