'हे' आहे जगातील सर्वात गूढ पुस्तक, या पुस्तकाला मानलं जातं शापित!

आजही जगात अशी काही पुस्तकं आहेत जी मानव वाचू शकत नाही. ही पुस्तकं आजही एक रहस्य आहेत. 

Updated: Aug 11, 2022, 12:47 PM IST
'हे' आहे जगातील सर्वात गूढ पुस्तक, या पुस्तकाला मानलं जातं शापित! title=

मुंबई : जगभरात पुस्तकांचा ट्रेंड प्राचीन काळापासून चालत आलाय, अनेकांना पुस्तकं वाचण्याची आवड आहे, परंतु आजही जगात अशी काही पुस्तकं आहेत जी मानव वाचू शकत नाही. ही पुस्तकं आजही एक रहस्य आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पुस्तकांबद्दल सांगणार आहोत ज्यांना रहस्यमय आणि शापित मानलं जातं.

ही पुस्तके सैतानी जगाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. ही पुस्तकं नकारात्मक उर्जेने भरलेली आहेत. यापैकी एक पुस्तक म्हणजे 'द बुक विथ इनक्रेडिबल पॉवर'.

गूढ शक्तींवर पुस्तक

या पुस्तकाला darkest book in the world असंही म्हटलं जातं. हे 1512 मध्ये लिहिलं गेलं होतं आणि हे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीबद्दल असं म्हटलं जातं की, ती व्यक्ती सैतानाच्या ताब्यात होती. हे पुस्तक इतकं धोकादायक आहे की, अनेक विधी पार पाडल्यानंतर ते व्हॅटिकन सिटीतील एका इमारतीत बंद करून ठेवण्यात आलं आहे. 

या पुस्तकात बसमध्ये पिशाच्च आणि गूढ शक्ती कशाप्रकारे घडतात याची माहिती देण्यात आलीये. असंही मानलं जातं की जर कोणी हे पुस्तक पूर्णपणे वाचलं तर त्याचा आत्मा सैतानाला विकावा लागेल. त्यामुळेच हे पुस्तक आता बंद करण्यात आलं आहे.

जादूगाराने असुरी आणि जादुई शक्ती सांगितल्या होत्या

हे पुस्तक 15 व्या शतकात अब्राहम नावाच्या व्यक्तीने लिहिलं होतं असं म्हटलं जातं. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी अब्राहम इजिप्तला गेला होता. जिथे त्याला एक जादूगार सापडला होता. जादूगाराने अब्राहमला राक्षसी आणि जादुई शक्तींबद्दल सांगितले. 

अब्राहमने या नकारात्मक गोष्टींना पुस्तकाचं स्वरूप दिलं. अब्राहमने या पुस्तकात अनेक नकारात्मक शक्तींबद्दल लिहिलंय जसं की, मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत कसं करावं? जगात सोने आणि खजिना कुठे दडला आहे? आत्म्याला भेटण्याचा मार्ग, अदृश्य होण्याचा मार्ग. हवेत उडण्याचा मार्गही या पुस्तकात सांगितला आहे. प्रत्येक माणसाच्या आत एक सैतान असतो असं म्हणतात आणि त्याच सैतानला भेटण्याचा मार्गही या पुस्तकात लिहिला आहे.

हे पुस्तक चामड्याच्या 160 पानांवर लिहिलंय. ज्याचं वजन 85 किलो आहे. म्हणूनच माणूस हे पुस्तक उचलू शकत नाही. हे पुस्तक 36 इंच लांब असून त्याची जाडी 8 इंच आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्राचीन काळी चामड्याच्या पानांवर असं पुस्तक लिहिणं अशक्य होतं.