वर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व

Cry a Thon Challenge: जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले. 

Updated: Jul 20, 2023, 03:37 PM IST
वर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व  title=

Crying Challenge: जागतिक विक्रम मोडण्याची क्रेझ जगभरात पसरली आहे. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये आपले नाव जाण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड करण्याच्या नादात नायजेरियन तरुणाला अंधत्व आले आहे. हा तरुण सात दिवस न थांबता रडण्याचा विश्वविक्रम करत होता. पण त्याचा शरिरावर विपरित परिणाम झाला आणि त्याला तात्पुरते अंधत्व आले. टेंबू एबेरे असे या महत्वाकांक्षी रेकॉर्डब्रेकर तरुणाचे नाव आहे. जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले. 

प्रचंड शारीरिक आणि भावनिक त्रास होऊ लागल्याने मला आक्रोश कमी करावा लागला. यावेळी अनेक अडचणी आल्या पण माझा निश्चय दृढ होता. मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अर्ज केला नसला तरी, हा एक चांगला प्रयत्न असल्याचे टेंबू एबेरे म्हणाला. 

इतर व्यक्ती अनोख्या पद्धतीने विक्रम मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकी सर्वात जास्त गोगलगाय तळण्याचा प्रयत्न करणारी एक महिला तर नॉन-स्टॉप सर्वात जास्त वेळ मसाज करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. जॉन ओबोट हे सर्वात जास्त वेळ मोठ्याने नॉन-स्टॉप वाचण्याचा विक्रम मोडण्याची योजना आखत आहे. किर्गिझस्तानच्या रिसबाई इसाकोव्हने गेल्या वर्षीच्या 124 तासांच्या सध्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. नायजेरियातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही त्यांची प्रेरणा आहे.

Hilda Baci च्या उल्लेखनीय कुकिंग मॅरेथॉनने 2019 मध्ये भारतातील पूर्वीचा विक्रम यशस्वीरीत्या मोडला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने नायजेरियन लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. रेकॉर्ड ब्रेकर्सनी त्यांच्या प्रयत्नांना अधिकृतपणे मान्यता मिळावी यासाधी संपर्क साधण्याचे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले. 

रेकॉर्ड-अ-थॉन्स, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सुरक्षा आणि जबाबदारी यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. आमचे अधिकारी प्रत्येक रेकॉर्डवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. असाधारण रेकॉर्डला पाठलाग करताना विवेकबुद्धी आणि व्यक्तींचा आदर ठेवला जावा, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.