Crocodile Attacking Video: मगरीशी पाण्यात वैर नको अशी म्हण प्रचलित आहे. या म्हणीवरून मगर पाण्यात किती घातक असेल याचा अंदाज येतो. पण मगर पाण्यात जितकी घातक असते तितकीच जमिनीवर घातक ठरू शकते. मगर पाण्याच्या काठावर असल्यास अचानक हल्ला देखील करू शकतात. आवश्यकतेनुसार मगर कोणालाही आपलं सावज करण्यास सहज सक्षम आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. गॅटरलँड ओरलॅंडो येथील बंदरावर एका क्युबन मगरीने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युनायटेड स्टेट्समधील थीम पार्क आणि वन्यजीव संरक्षणाने ही धक्कादायक क्लिप फेसबुकवर शेअर केली आहे.
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक महाकाय मगर एका बंदरात एका माणसावर धावत हल्ला करताना दिसत आहे. आपला जीव वाचवण्यासाठी सदर व्यक्ती पळतो आणि कुंपणावरून उडी मारतो. सुदैवाने सदर व्यक्ती मगरीच्या तावडीत सापडत नाही. विशेष म्हणजे मगर आपल्या पंज्यांवर उभी राहून वेगाने धावताना दिसते. असा प्रकार यापूर्वी तुम्ही क्वचितच पाहिला असेल.
व्हिडीओ शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'चेनसॉ इन अॅक्शन. आमची अद्भुत क्यूबन मगर!' 8 सेकंदाचा व्हिडीओ पाहताच तुम्हाला धक्का बसेल. क्युबन मगर ही एक मध्यम आकाराची प्रजाती असून क्युबामध्ये फक्त दोन दलदलीच्या अधिवासात आढळते
क्लिप पाहिल्यानंतर अनेक युजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, 'फ्लोरिडियन म्हणून, मी पाहिलेली ही सर्वात भयानक गोष्ट असू शकते.' दुसर्या यूजरने लिहिले, 'व्वा... मी कधीच मगरीला धावताना पाहिलेले नाही.