Viral Video पाहून दचकाल; पाणी प्यायला गेलेल्या बिबट्याचा मगरीकडून खेळ खल्लास

बिबट्याचाच कसा शिकार होतो, हे पाहून क्षणार्धासाठी दचकायलाच होत आहे.

Updated: Mar 26, 2022, 04:14 PM IST
Viral Video पाहून दचकाल; पाणी प्यायला गेलेल्या बिबट्याचा मगरीकडून खेळ खल्लास  title=

मुंबई : मगरीचा उल्लेख पाण्यातील ‘जल्लाद’ म्हणून केला जातो. हरणआपासून ते अगदी माणसापर्यंत, सर्वांनाच ही मगर महागात पडू शकते. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इतरांची शिकार करणाऱ्या बिबट्याचाच कसा शिकार होतो, हे पाहून क्षणार्धासाठी दचकायलाच होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणं बिबट्या पाणी पिण्यासाठी म्हणऊ जलस्त्रोतापाशी येतो, आणि पाण्याला तोंड लावून तो ते पिण्यास सुरुवात करतो. तेव्हाच पाण्यातला जल्लाद, अर्थात मगर येते आणि....

मगर हळुवारपणे, संकेतही न देता बिबट्याच्या जवळ येते आणि पापणी लवायच्या आतच त्याच्या मानेवर दातांची पकड धरते.

बिबट्या तडफडतो, निसटण्याचा प्रयत्न करतो; पण त्याचे हे प्रयत्न इथं सपशेल अपयशी ठरताना दिसतात. कारण, जबडा आणखी घट्ट करत मगर बिबट्याचा श्वास रोखण्याचं काम करते आणि शिकार पाण्याच्या आत नेते.

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर कमालीची पसंती मिळताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ कमालीचा व्हायरलही केला जात आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती असते. हा व्हिडीओसुद्धा त्याच असंख्य व्हिडीओंपैकी एक आहे. असे प्राणी अनेकदा जवळून पाहण्याची संधी मिळत नाही, त्याचीच कसर असे व्हिडीओ भरुन काढतात नाही...