चीनमध्ये थंडी वाढताच 'कोरोनाचा स्फोट', शांघाय, बीजिंगसह मोठ्या शहरात उद्रेक

अख्ख्या जगाला कोरोना महामारी (Corona) देणाऱ्या चीनमध्ये (China) परत एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय.  

Updated: Nov 24, 2022, 10:37 PM IST
 चीनमध्ये थंडी वाढताच 'कोरोनाचा स्फोट', शांघाय, बीजिंगसह मोठ्या शहरात उद्रेक  title=

बिजिंग : जगभरात कोरोना (Corona) पसरवणाऱ्या चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झालाय. 11 नोव्हेंबरपासून चीनमधले कोरोना निर्बंध हटवण्यात आले. मात्र त्यानंतर चीनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातलाय. पाहुयात एक रिपोर्ट.  अख्ख्या जगाला कोरोना महामारी देणाऱ्या चीनमध्ये परत एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. (covid 19 virus china corona increased after unlock see full report)

चीनमध्ये थंडी सुरु होताच कोरोना वाढायला लागलाय. अनेक शहरात कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु झालंय. 11 नोव्हेंबरपासून चीननं कोरोना निर्बंध काढून टाकले, त्यानंतर दोनच आठवड्यात चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. बीजिंग, शांघाय अशा मोठ्या शहरात कोरोना उच्चांकी पातळीवर आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 

चीनमध्ये 'कोरोना रिटर्न्स'

तारीख आणि रुग्ण

20 नोव्हेंबर -26 हजार 824

23 नोव्हेंबर -31 हजार 454

चीनमध्ये कोरोना अचानक वेगानं पसरतोय. त्यामुळे वेगानं पसरणारा एखादा घातक व्हेरिएंट तर चीनमध्ये आलेला नाही ना..याचं संशोधन सुरु आहे. चीनमधून भारतात आणि भारतातून चीनमध्ये विमान सेवा सुरु आहे. जहाजांद्वारे मालवाहतूक सुरु आहे. थोडक्यात चीनमध्ये धुमाकूळ घालणारा कोरोना परत भारतात येण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर गेल्यात.