आशादायक! चीनचा कोरोना व्हायरसला पहिल्यांदा दणका

चीनच्या एका मंत्र्य़ाने कोरोना व्हायरसवर लवकरच विजय मिळवण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. हा आशावाद व्यक्त करताना

Updated: Mar 4, 2020, 02:54 PM IST
आशादायक! चीनचा कोरोना व्हायरसला पहिल्यांदा दणका title=

बिजिंग : चीनच्या एका मंत्र्य़ाने कोरोना व्हायरसवर लवकरच विजय मिळवण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. हा आशावाद व्यक्त करताना चीनने म्हटलं आहे की, मागील दीड महिन्यात नव्याने कोरोनाचं संक्रमण होण्याची प्रकरण कमी होत चालली आहेत, खऱ्या अर्थाने हा कोरोनावर विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चीनने यावर औषध अजून शोधलं नसलं तरी, फैलाव वेगाने रोखण्यास चीनला यश मिळतंय हे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. पुढील आठवड्यात यापेक्षा कोरोनाचे संक्रमण झालेल्यांचा आकडा कमी झाल्याने हा आशावाद व्यक्त केला आहे. बुधवारी कोरोना म्हणजे COVID-19 च्या एकूण 125 नवे रूग्ण नोंदवले गेले आहेत. 

24 तासाच्या आत 125 नवे रूग्ण आले आहेत. हा आकडा मागील आकड्यांपेक्षा कमी असल्याचा चीनच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा आहे. 21 जानेवारीनंतर पहिल्यांदा एवढे कमी रूग्ण नोंदवले गेले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मागील सहा आठवड्यात हा सर्वात कमी आकडा असल्याचा त्यांचा दावा आहे.

हुवेई प्रांतातील कोरोनाच्या उगम क्षेत्रात आणखी 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 80 हजार 151 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, आतापर्यंत कोव्हिड-19 अर्थात कोरोना व्हायरसने 2 हजार 943 लोकांचा बळी चीनमध्ये घेतला आहे.

चीनने कोरोना व्हायरस विरोधात लढण्यात मोठं यश मिळवलं आहे, सध्या स्थिती खरोखर स्थिर असल्याचं चीनने म्हटलं आहे.

दुसरीकडे दक्षिण कोरियात कोरोना व्हायरस COVID-19 चा फैलाव वेगात सुरू आहे. कोरियात एकूण 5 हजार 186 लोकांना Coronavirus ची लागण झाली आहे, त्यात 851 नवीन रूग्ण आहेत.

आणखी इराणमध्ये 2 हजार 300 coronavvirus चे रूग्ण आहेत, यातील 77 लोकांनी जगाचा निरोप घेतला आहे. इराण सरकारने लष्काराला लोकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.