जगभरात कोरोना पसरवणारं 'वुहान' शहर कोरोनामुक्त

राष्ट्रीय स्वास्थ आयोगने (NHC) केलेल्या दाव्यानुसार

Updated: Apr 27, 2020, 09:15 PM IST
जगभरात कोरोना पसरवणारं 'वुहान' शहर कोरोनामुक्त  title=

बीजिंग : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ज्या शहरामुळे पसरला ते चीनमधील वुहान शहर हे कोरोनामुक्त झालं आहे. वुहानमधील Covid-19 च्या सगळ्या रूग्णांना रूग्णालयातून सोडण्यात आलं आहे. तसेच वुहानमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे. संपूर्ण चीनमध्ये कोरोनाचे तीन नवे रूग्ण सापडले असून कुणाचाही यामध्ये अद्याप मृत्यू झालेला नाही. 

राष्ट्रीय स्वास्थ आयोगने (NHC) केलेल्या दाव्यानुसार कोरोनाबाधित एकही रूग्ण नाही. NHC चे प्रवक्त मी फेंग (Mi Feng) यांनी सोमवारी सांगितलं की, वुहान आता कोरोनामुक्त झालेला आहे. रविवारी देशात चीन नवे रूग्ण आढळले. पण यामधील दोन संक्रमित व्यक्ती परदेश दौरा करून आले होते. म्हणजे त्यांना कोरोनाचं संक्रमण हे चीनच्या सीमेबाहेर झालं होतं. तर तिसरा रूग्ण हा उत्तर पूर्व सीमेतील हेइलोंगजियांगमध्ये झालं आहे. 

हेइलोंगजियांग हे रसियाच्या (Russia) सिमेवर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे संक्रमण झालेल्या गोष्टी कानावर येत होते. यानंतर चीन प्रशासनाने सीमा सील केल्या. चीनने आतापर्यंत कोरोनाचे ८२ हजार कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली होती. यामध्ये ४६३३ लोकांचा मृत्यू झाला होता.