वॉशिंग्टन : जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत १७ लाख ६,२२६ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ९९ हजार ८०५ जणांचा मृत्यू झालाय. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत ४ लाख ६२ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात गेल्या चोविस तासांत कोरोनाचे ८८ हजार २८८ नवे रुग्ण आढळले असून, ३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ८२ हजारांवर गेली आहे. तर बळींचा आकडा ३ लाख ४७ हजारांवर पोहोचलाय. अमेरिका, रशिया, ब्राझील या देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
BreakingNews । जगभरात गेल्या चोविस तासांत कोरोनाचे ८८ हजार २८८ नवे रुग्ण आढळले असून, ३ हजार रुग्णांचा मृत्यू । त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ८२ हजारांवर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली https://t.co/HOK58ckddW
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 26, 2020
ब्राझीलमध्ये आतापर्यंत ३ लाख ७६ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर २३ हजार ५१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ५३ हजार ८३३ रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना १ लाख ९९ ह जार ३१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रशियातही परिस्थिती चिंताजणक आहे. रशियात ३ लाख ५३ हजार ४२७ एकूण रुग्ण आहेत. १ लाख १८ हजार ७९८ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, तीन हजार ६३३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमध्ये २ लाख ८२ हजार ४८० रुग्ण असून त्यापैकी २६ हजार ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ९६ हजार ९५८ लोक ठणठणीत बरे झाले आहेत. युकेमध्ये २ लाख ६१ हजार १८४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ३६ हजार ९१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारत देश जगात दहाव्या क्रमांकावर आहे. भारतात १ लाख ४४ हजार ९५० रुग्ण असून ४१७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हजार ७०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अॅक्टीव्ह केसेस ८० हजार ७२ आहेत.