Coronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...

Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.

Updated: Dec 21, 2022, 04:03 PM IST
Coronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...  title=

Andhra Pradesh Corona Virus: जगात पुन्हा एकदा कोरोनाचा (corona update) कहर दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना विषाणूच्या (Corona) प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ चीनच नाही तर युरोपसह (Europe) अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगानेवाढत आहेत. पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के आणि पृथ्वीच्या 10 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आज चीनमधील (coronavirus in china) एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये रस्त्यावर मृतदेहांचा ढीग असल्याचे दिसून आले आहे.

याचदरम्यान आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागातील दोन महिलांनी कोरोनाची लागण झाली म्हणून तब्बल दोन वर्षे स्वत:ला घरात कोंडून घेतलं. ही धक्कादायक घटना काकीनाडा येथील कुयेरू गावातील आहे. यावेळी कुटुंबप्रमुखाने आई आणि मुलीची प्रकृती खालावल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर दोघांनाही काकीनाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला, यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. अखेर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला समजावून दार उघडण्यास भाग पाडलं आणि बळजबरीने रुग्णालयात नेण्यात आलं. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा संशय आहे. दोन्ही महिला मानसिक आजारी असल्याचा संशय असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मणि आणि त्यांची मुलगी दुर्गा भवानी यांनी 2020 मध्ये कोविडच्या कहरानंतर स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव नंतर आटोक्यात आला असला तरी आई-मुलीने स्वत:ला वेगळे ठेवले. मणीचा नवरा तिला खायला पाणी देत होता. पण गेल्या एक आठवड्यापासून ती त्याला तिच्या खोलीत जाऊ देत नव्हती. यानंतर त्यांनी याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती दिली.

अशा घटनाही समोर आल्या आहेत

राज्यातील ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अशीच एक घटना उघडकीस आली होती. कोविडची लागण होण्याच्या भीतीने तीन महिलांनी जवळपास 15 महिने स्वत:ला घरात कैद केले होते. त्याच वेळी, कोविडमुळे त्यांच्या शेजाऱ्याच्या मृत्यूनंतर एक जोडपे आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतःला वेगळे केले होते. सरकारी योजनेंतर्गत निवासी भूखंड मंजूर करण्यासाठी गावातील एक स्वयंसेवक त्याच्या अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी गेला तेव्हा ही बाब उघडकीस आली.