चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार थांबेना, 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ

Covid-19 outbreak in China : चीनमध्ये कोरोनाचं थैमान कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे तब्बल 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ आली आहे. 

Updated: Mar 22, 2022, 07:39 PM IST
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार थांबेना, 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ    title=

बीजिंग :  Covid-19 outbreak in China : चीनमध्ये कोरोनाचं थैमान कमी व्हायला तयार नाही. लियओनिंग प्रांतातील शेनयांग शहरात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ आली आहे. 

चीनमध्ये ओमायक्रॉनची लाट भीषण होत आहे. त्यामुळे तिथल्या सरकारने झिरो कोविड धोरण राबवले आहे. थोडेसे रुग्ण सापडले तरी शहरं लॉकडाऊन करण्यात येतायत. त्याशिवाय टेस्टिंग आणि ट्रॅकिंगही वाढवण्यात आलंय. चीनमध्ये वर्षभरानंतर शनिवारी कोरोनामुळे दोन बळी गेलेत. 

कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. चीनने लियओनिंग प्रांतातील शेनयांग शहराला लॉकडाउन करण्याचे आदेश सोमवारी रात्री देण्यात आले.  चिनी आरोग्य अधिकार्‍यांनी देशात 4,770 नवीन संसर्ग नोंदवले आहेत. चीनने 90 लाख लोकसंख्या असलेल्या औद्योगिक शहराला पुन्हा टाळे लागले आहे. मंगळवारी चीनमध्ये एका दिवसात 4,000 हून अधिक कोविड रुग्ण आढळले. यातील बहुतांश संसर्ग ईशान्येकडील जिलिन प्रांतात आढळून आले आहेत. 

चीनने अलिकडच्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने कृती केली आहे. एकीकडे हायपरलोकल लॉकडाऊन लावले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाची मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जात आहे. गरज पडेल तेव्हा कठोर लॉगडाऊन लावला जाईल आणि शहर बंद केले जात आहे. चीनमध्ये वर्षभरानंतर शनिवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे.