Corona : इराणमध्ये कोरोनाचं थैमान, अडीच हजारांहून अधिक बळी

जगभरामध्ये परसलेल्या कोरोना व्हायरसने इराणमध्ये थैमान घातलं आहे. 

Updated: Mar 29, 2020, 04:59 PM IST
Corona : इराणमध्ये कोरोनाचं थैमान, अडीच हजारांहून अधिक बळी title=

दुबई : जगभरामध्ये परसलेल्या कोरोना व्हायरसने इराणमध्ये थैमान घातलं आहे. इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २,६४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८,३०९ जणांना कोरोना झाला आहे. कोरोनामुळे आखाती देशांमधल्या इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.

'मागच्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २,९०१ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे इराणमधला कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८,३०९ झाला आहे,' असं इराणच्या आरोग्य मंत्र्यांचे सल्लागार अलीरझा वहाबजादेह यांनी केलं आहे. १२,३९१ जण कोरोनातून बरे झाल्याचंही ते म्हणाले.

'इराणमध्ये कोरोनाच्या ३,४६७ रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. पण १२,३९१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत, ही दिलासादायक गोष्ट आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं सरासरी वय ६९ वर्ष आहे,' अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कियानुष जहानपूर यांनी दिली आहे.