कोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु

ब्रिटनमध्ये  नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे. 

Updated: Dec 23, 2020, 08:06 AM IST
कोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु  title=

मुंबई : ब्रिटनमध्ये अत्यंत धोकादायक कोरोनाचा नवा विषाणू (Corona new virus) सापडल्याने भीती व्यक्त होत आहे. त्यातच भारतात ब्रिटनमधून  (Britain) आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) सापडले आहेत. त्यामुळे भारतात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, काही महिन्यात कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळत असताना नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे. 

ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

येत्या सहा आठवड्यात नवी लस तयार करु शकतो, असा विश्वास फायझर बायोटेक ( Pfizer-BioNTech) या कंपनीने व्यक्त केला आहे. अपग्रेड विषाणूशी सामना करण्यासाठी आता लसही अपग्रेड करण्यात येणार आहे. सध्याची लसही प्रभावी आहे. विषाणूत थोडासा बदल झाला आहे. त्याने फरक पडणार नसला तरी लस उत्पादक कंपन्या त्याप्रमाणे लसमध्येही बदल करणार आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

भारतात १६३ दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांच्या खाली आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. देशातल्या ६ राज्यांमध्ये ५७ टक्क्यांहून अधिक केसेस आहेत. लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. पुढचा धोका ओळखून जागरूक राहा, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून तशा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ब्रिटनहून (Britain) परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत एकही प्रवासी पॉझिटिव्ह (Corona positive) नसला तरी महिनाभरात ब्रिटनहून परतलेल्या सगळ्या प्रवाशांची होणार कोरोना टेस्ट होणार आहे.