बापरे! पुन्हा कोरोनाचा धोका, 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लागला लॉकडाऊन

तब्बल दोन वर्षांनंतर जनजीवन काहीसं पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी

Updated: Mar 11, 2022, 07:18 PM IST
बापरे! पुन्हा कोरोनाचा धोका, 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लागला लॉकडाऊन title=

COVID-19 : गेली दोन वर्ष जगभरात कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला. कोरोनामुळे जगभरात करोडो लोकांना जीव गमवावे लागले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. उद्योगधंदे पुन्हा सुरु झालेत, जनजीवन काहीसं पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा चीनने (China) जगभराचं टेन्शन वाढवलं आहे. 

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर
चीनने शुक्रवारी 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन या ईशान्येकडील शहरामध्ये लॉकडाउन लावण्याचे आदेश दिले. या शहरात कोविड-19 च्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यासाठी चीन सरकारने हा आदेश दिला आहे.

या शहरात कडक निर्बंध लादण्यात आले असून रहिवाशांना घरीच राहावे लागणार आहे. इथल्या नागरिकांना तीनवेळा चाचण्या करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आवश्यक नसलेले व्यवसायही बंद करण्यात आले असून सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

लोकल ट्रान्समिशनची 397 प्रकरणे
चीनमध्ये शुक्रवारी स्थानिक संक्रमणाची आणखी 397 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 98 प्रकरणं जिलिन प्रांतातील आहेत. तर शहरात केवळ दोन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. पण शून्य कोरोनाच्या धोरणाचा भाग म्हणून सरकारने एक किंवा अधिक प्रकरणं असलेल्या भआगात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढता प्रादुर्भाव पाहाता चीनमध्ये पहिल्यांदाच रॅपिड अँटिजन टेस्ट सुरु करण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा उगम चीनमधून
2019 च्या सुरुवातीला चीनमध्ये कोविड-19 चा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्याचा प्रसार जगभरात झाला.