मुंबई : चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेबाबत (Corona In China) रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येतेय. दोन वर्षांपूर्वीपेक्षा यावेळी स्थिती अधिक गंभीर असल्याचं सध्या हाती येणाऱ्या बातम्यांवरून दिसतंय. कोरोनामुळे चीनमधील स्थिती दिवसेंदिवस हालाकीची होत चालली आहे. यावेळी 2020 पेक्षाही भीषण परिस्थिती असल्याचं सांगितलं जातंय. ओमायक्रॉनची चौथी लाट ही इतकी भयंकर आहे की टेस्टिंगसाठी लोकांमध्ये हाणामारी सुरू आहे. (corona cases are incresed very fast in china likley worst situation after 2020)
चौथ्या लाटेनं चीन बेजार
कोरोना पॉझिटीव्ह झालेल्यांना आणि त्यांच्या नातलगांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा अपुरी पडतेय. त्यामुळे लोकांना आपपल्या घरातच कैद्यासारखं राहावं लागतंय. केवळ 3 दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा शिल्लक असल्याची माहितीही समोर आलीये. हाँगकाँगची परिस्थिती आणखीनच विदारक आहे. अंत्यसंस्कारांसाठी पुढच्या 1 महिन्याचं बुकींग फुल झालंय.
चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिलाच गेला नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
आगामी काळात केवळ निर्बंध कडक करून लाट नियंत्रणात येते की आणखी काही कठोर उपाययोजना कराव्या लागतात, हे निश्चित होईल असं ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक चेन झेंगमिन यांनी म्हटलंय. चीनच्या भिंतीपलिकडे नेमकं काय घडतं हे कधीही बाहेर येत नाही. मात्र जी काही थोडीफार माहिती समोर येतेय, त्यावरून परिस्थिती भयानक असल्याचंच दिसतंय.