Video: सायकल शर्यत जिंकल्यानंतर पतीने उत्साहात केलं असं की, पत्नी झाली बेशुद्ध

कोणतीही शर्यत जिंकल्यानंतर आनंद हा साहाजिकच आहे. आनंदाच्या भरात कोण काय करेल? याचा नेम नाही.

Updated: Jun 7, 2022, 03:39 PM IST
Video: सायकल शर्यत जिंकल्यानंतर पतीने उत्साहात केलं असं की, पत्नी झाली बेशुद्ध  title=

नवी दिल्ली: कोणतीही शर्यत जिंकल्यानंतर आनंद हा साहाजिकच आहे. आनंदाच्या भरात कोण काय करेल? याचा नेम नाही. सायकलस्वार लुईस कार्लोस सियाने वार्षिक सायकलिंग शर्यतीत वुएल्टा अ कोलंबियामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रथम क्रमांक पटकावला. पहिला क्रमांक आल्यानंतर तो सायकलस्वार आनंद साजरा करत होता, पण तेवढ्यात अपघात झाला. सायकलस्वाराची पत्नी अंतिम रेषा ओलांडत असताना त्याचे फोटो काढत होती. शर्यतीतील अंतिम रेषा गाठल्यानंतर थेट सायकल घेऊन पत्नीला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती की, पत्नी तिथल्या तिथे बेशुद्ध झाली. त्याच्या पत्नीचं नाव क्लॉडिया रोनाकियो आहे. सायकल धडकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

लुईस कार्लोसने विजयी रेषा ओलांडताच त्याने आनंदाने छातीवर हात मारत आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. काही अंतरावर लुईसची बायको त्याचे फोटो क्लिक करत होती. आनंदाच्या भरात पतीने समोर उभी असलेल्या पत्नीला पाहिलं नाही आणि धडक दिली. सायकल इतक्या वेगात होती की आदळल्यानंतर पत्नी रस्त्यावरच कोसळली. एका टीव्ही समालोचकाने तिला उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती बेशुद्धावस्थेत होती. 

कार्लोसने कोलंबियातील एका वृत्तपत्राला सांगितले की, 'मला ब्रेक लावायचा होता पण ब्रेक लावू शकला नाही. आणि माझ्या पत्नीला धडक लागली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आहे. आता ती व्यवस्थित आहे. पण ती त्या वेळेस बाजूला का झाली नाही? कळत नाही.'