ख्रिसमस सेलिब्रेशन : कुठे धावला सांताक्लॉज तर कुठे झाला समुद्राच्या लाटांवर स्वार

जगभरात सेलिब्रेशनचा मूड आत्तापासूनच दिसून येतोय

Updated: Dec 19, 2019, 05:35 PM IST
ख्रिसमस सेलिब्रेशन : कुठे धावला सांताक्लॉज तर कुठे झाला समुद्राच्या लाटांवर स्वार  title=
सांताक्लॉज रस्त्यावर धावताना

नवी दिल्ली : अमेरिकेपासून ब्राझिलपर्यंत जगाच्या प्रत्येक देशात ख्रिसमसची तयारी जोरदार सुरू आहे. ख्रिसमस ट्री सजलेत, सांताक्लॉजचेही वेध लागलेत. ख्रिसमस सेलिब्रेशनला आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे...मात्र जगभरात सेलिब्रेशनचा मूड आत्तापासूनच दिसून येतोय...कुठे ख्रिसमस ट्री सजवण्याची लगबग... कुठे आकर्षक रोषणाई...तर कुठे सांताक्लॉजच्या येण्याची वाट पाहाणं...

ब्राझिल - २३० फूट उंच ख्रिसमस ट्री

ब्राझिलच्या रियो दी जेनेरियोमधल्या या ख्रिसमस ट्रीने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय...पाण्यावर तरंगणारा सजलेला हा ख्रिसमस ट्री समोरच्या आपलं भान विसरायला लावतोय...नजरा रोखून धरायला लावतोय... 

Image result for Lagoa Christmas tree in southern Rio de Janeiro, Brazil"
२३० फूट उंचीचा ख्रिसमस ट्री

हा ख्रिसमस ट्री तब्बल २३० फूट उंच आहे...एखाद्या २४ मजली इमारती एवढा उंच हा ख्रिसमस ट्री आहे वेगवेगळ्या रंगांच्या लाईट्समुळे याच्या सौदर्यांत आणखीनंच भर पडतेय...यावेळी सादर होणारा म्युझिकल शो आणि फटाक्यांची आतषबाजी चांदचार लावतं. 

शनिवारी या ख्रिसमस ट्रीचं उदघाटन करण्यात आलं. या ख्रिसमस ट्रीसाठी ९ लाख एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आलाय...या लायटिंगमुळे वेगवेगळ्या अशा आठ पॅटर्नच्या स्वरुपात हा ख्रिसमस ट्री दिसतो... हा ख्रिसमस ट्री पाहण्यासाठी ब्राझिल आणि आसपासच्या शहरांतील नागरिकांनी गर्दी केली होती.

साओ सेबेस्टियाओ, ब्राझिल - समुद्राच्या लाटांवर स्वार झालेला सांता

इथे तर समुद्राच्या लाटांवर तो मनमुराद सर्फींग करणारा सांताक्लॉज दिसतोय. पण हा सांताक्लॉज म्हणजे ब्राझिलचा प्रसिद्ध सर्फर...   
 

A man dressed as Santa Claus surfs at the Maresias beach in Sao Sebastiao, Sao Paulo state, Brazil December 15, 2019.   REUTERS/Amanda Perobelli
समुद्राच्या लाटांवर स्वार झालेला सांता

ग्रीस - रस्त्यावर धावले सांताक्लॉज

ग्रीसच्या एथेंसमध्ये तर शेकडो सांताक्लॉज रस्त्यावर धावताना दिसले. सांताचे कपडे, हातात घंटा आणि हसतमुख चेहऱ्याने ही दौड झाली. ज्यात अनेक पुरुष महिलांसोबत लहान मुलांनीही सहभाग घेतला होता.

People dressed as Santa Claus take part in a Santa Claus Run in Athens, Greece, December 15.   REUTERS/Costas Baltas
ग्रीसमधला ख्रिसमस

न्यूयॉर्क - लैंटर्नचं आकर्षण

अमेरिकेमध्येही ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी आकर्षक अशा फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. न्यूयॉर्कमधल्या हॅलो पांडा फेस्टिव्हलमध्ये जवळपास १२० लैंटर्न नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. तर ६० फूट उंच ख्रिसमस ट्री सजवण्यात आलाय. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये ६० कलाकारांनी आपलं कौशल्य दाखवत वेगवेगळे लैंटर्न तयार केले आहेत. ज्यासाठी १० लाख लाइट्सचा वापर करण्यात आलाय. एकूणच काय तर, जसजसे दिवस जवळ येतायत तसतसा जगभरात ख्रिसमसचा रंग अधिकच खुलून येतोय.