नवी दिल्ली : ख्रिसमसची तयारी सर्वत्र पूर्ण झाली आहे. नागरिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत तसेच शॉपिंगही मोठ्या प्रमाणात करत आहेत. एकमेकांसाठी गिफ्टही घेत आहेत. चर्चपासून मॉल्स आणि रस्त्यांवर ख्रिसमसची धूम पहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी विविध खेळ आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. २५ डिसेंबरपासून सुरु होणारा हा सण ख्रिस्ती धर्मिय नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतात. परदेशात ख्रिसमससाठी मोठी सुट्टी देण्यात येते. पाहूयात जगभरात कशाप्रकारे ख्रिसमसची तयारी सुरु आहे...
शिकागो: ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लिंकन पार्क सजविण्यात आलं आहे.
शिकागो: लिंकन पार्कमध्ये थँक्स गिव्हींगपासूनच रोशनाई करण्यात येते. ही रोशनाई नव्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ठेवण्यात येते.
इज्राइल: जेरुसलेममध्ये भलेही राजधानीसंदर्भात वाद सुरु आहे. मात्र, येथे ख्रिसमस दरम्यान नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी सँताक्लॉज ऊंटवर बसून आला.
कॅनडा : टोरंटोमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने प्रत्येक घराला आकर्षक रोशनाई करुन सजविण्यात आलं आहे.
कॅनडा : घरांच्या बाहेर सजावट करुन स्नोमॅनही बनविण्यात आला आहे.
क्रोएशिया : येथे ख्रिसमसच्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सँताक्लॉजची वेशभूषा केली होती.
स्वीडन : या ठिकाणीही एक स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये स्पर्धक स्लेजवर सँताक्लॉजच्या वेशभूषेत पहायला मिळाले.
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील लोअर मॅनहटनमधील दुकानंही ख्रिसमससाठी सजले आहेत. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट केली आहे.