चीनची पोल खोल, गलवान खोरे चकमकीबाबत ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

china Galwan Valley Clash : गलवान खोऱ्यामध्ये चिन आणि भारतीय सैनिकांमध्ये  2020 मध्ये झालेल्या हिंसक चकमकीबाबत एक मोठा खुलासा ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने केला आहे.  

Updated: Feb 3, 2022, 09:11 AM IST
 चीनची पोल खोल, गलवान खोरे चकमकीबाबत ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये मोठा खुलासा title=

नवी दिल्ली :  china Galwan Valley Clash : गलवान खोऱ्यामध्ये चिन आणि भारतीय सैनिकांमध्ये  2020 मध्ये झालेल्या हिंसक चकमकीबाबत एक मोठा खुलासा ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने केला आहे. यामुळे चीनचा पर्दाफाश झाला आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकींमध्ये चीनने दावा केला होता त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे अहवालात समोर आले आहे.

चिनी सैनिक नदीत बुडाले

यासोबतच खोऱ्यातील गलवान नदी ओलांडताना अनेक चिनी सैनिक बुडाले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा खुलासाही अहवालात करण्यात आला आहे. चीनचे मोठे नुकसान झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

संशोधक आणि चीनी ब्लॉगर्सनी केले खुलासे 

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन'ने चीनमधील अज्ञात संशोधक आणि ब्लॉगर्सचा हवाला दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आपले नाव उघड केलेले नाही, असे म्हटले आहे, परंतु त्यांना जे समजले त्यावरुन गलवान खोऱ्यातील घटनेबाबत अनेक खुलासे झाले आहेत. 

चीनचे मोठे नुकसान  

चीनच्या नुकसानीचे दावे नवीन नाहीत, परंतु सोशल मीडिया संशोधकांच्या एका गटाने दिलेल्या पुराव्यांवरुन असे दिसते की 'द क्लॅक्सन'च्या बातम्यांवर आधारित आहे. चीनचे नुकसान झाले आहे,  असे अहवालात म्हटले आहे. बीजिंगद्वारे सांगण्यात आलेल्या चार सैनिकांच्या मृत्यू पेक्षा आकडा जास्त नुकसानीचा आहे. या अहवालात म्हटले आहे की, बीजिंग कोणत्या मर्यादेपर्यंत संघर्षावर चर्चा करु शकत नाही, हे देखील दर्शविले आहे.

2020 पासून सीमेवर वाद 

 भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) वाद 2020 मध्ये सुरु झाला, जेव्हा चीनने लडाखमधील अक्साई चिनच्या गलवान खोऱ्यात भारताने रस्ता बांधण्यावर आक्षेप घेतला. 5 मे 2020 रोजी भारतीय लष्कर आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाल्यानंतर लष्करी अडथळे निर्माण केले गेलेत.

20 भारतीय जवान शहीद 

5 मेच्या घटनेनंतर सिक्कीममधील नाथू ला  (Nathu La) येथे 9 मे रोजी भारतीय सैनिकांसोबत चिनी सैनिकांनी झडप घातली होती. ज्यात अनेक सैनिक जखमी झाले होते. यानंतर 15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले.