बीजिंग : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरूणाचल भेटीला चीनने विरोध केला आहे. द्विपक्षीय संबंधात 'निर्णायक' क्षण आला असताना भारताने असे पाऊल उचलून सीमा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनण्यापासून वाचले पाहिजे, असा फुकटचा सल्लाही चीनने दिला आहे.
राष्ट्रपती कोविंद यांनी रविवारी १९ नोव्हेंबरला अरूणाचला प्रदेशाला भेट दिली. कोविंद यांच्या भेटीबद्दल चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता ल्यू कांग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, चीनचे सरकार तथाकथीत अरूणाचल प्रदेशचा स्वीकार करत नाही. सीमा मुद्द्यावर आमची स्थिती दृढ आणि स्पष्ट आहे.
चीन नियमितपणे कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याची अरूणाचल प्रदेशला भेटीला विरोध करत आलेला आहे.
भारताने चीनचा विरोध फेटाळला आहे. अरूणाचल प्रदेश हे भारताचे अभिन्न अंग आहे. भारतीय नेत्यांना देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचे जसे स्वातंत्र्य आहे तसेच या ठिकाणी भेट देण्याचे स्वातंत्र्य आहे. दोन्ही देश निष्पक्ष आणि उचित तोडगा काढण्यासाठी चर्चाचा मार्ग अवलंबित आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी शांततेच्या काळात प्रलंबित राहिलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे काम केले पाहिजे.