11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध

जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 18, 2023, 06:42 PM IST
11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध title=

Trident worlds largest underwater telescope : चीन पुन्हा एकदा जगावेगळी मोहिम हाती घेतली आहे.  11,500 फुट खोल समुद्रात चीन महाकाय दुर्बीण अर्थात टेलिस्कोप बसवणार आहे. समुद्रात अशा प्रकारे टेलिस्कोप बसवण्याची पहिलीच वेळ आहे. या दुर्बिणीच्या माध्यमातून चीन  रहस्यमयी कणांचा शोध घेणार आहे. 

पश्चिम पॅसिफिक महासागरात चीन हा टेलिस्कोप बसवणार आहे.  जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप ठरणार आहे. याचे नाव नाव ट्रॉपिकल डीप सी न्यूट्रिनो टेलिस्कोप - ट्रायडेंट (Trident)  असे आहे. 2030 पर्यंत हे टेलिस्कोप प्रत्यक्षात एक्टीव्ह होणार आहे. ट्रायडेंट टेलिस्कोपच्या मदतीने  न्यूट्रिनो म्हणजेच घोस्ट पार्टिकल्स अभ्यास केला जाणार आहे. सध्या, जगातील सर्वात मोठा न्यूट्रिनो डिटेक्टर टेलिस्कोप अंटार्क्टिकामधील अमुंडसेन-स्कॉट दक्षिण ध्रुवा वरील संशोधन केंद्राजवळ आहे. 1 घन किलोमीटर क्षेत्र परिसराचे निरीक्षण करणे या दुर्बीणीच्या माध्यमातून शक्य होते. 

घोस्ट पार्टिकल्स म्हणजे आहे काय?

घोस्ट पार्टिकल्स हे अतिशय सूक्ष्ण असे रहस्यमयी कण आहेत. प्रति सेकंद 100 अब्ज म्हणजेच 1000 कोटी घोस्ट पार्टिकल्स प्रत्येक चौरस सेंटीमीटरमधून मानवाच्या शरीरात प्रवेश करत असतात. घोस्ट पार्टिकल्स ऊर्जेचा अदृष्य स्रोत आहेत. घोस्ट पार्टिकल्स कणांची गणना करता येत नाही.  यांचे वजनही नसते. घोस्ट पार्टिकल्स हे कोणत्याही पदार्थाशी संवाद साधत नाहीत. 

घोस्ट पार्टिकल्सच्या संशोधनामुळे  विश्वाच्या उत्पतीचे रहस्य उलगडणार

घोस्ट पार्टिकल्सच्या संशोधनामुळे  विश्वाच्या उत्पतीचे रहस्य उलगडणार आहे. घोस्ट पार्टिकल्स कणांची गती कमी करुन त्याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. अंतराळात होणारे स्फोट, प्रकाश, अंधार आणि अवकाशात घडणाऱ्या अनेक खगोलीय घटनांचे रहस्य उलगडणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ जू डोंगलियन यांनी ही माहिती दिली. 

जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप नेमका कसा असेल?

चीनच्या या  ट्रायडेंट टेलिस्कोपमध्ये 24 हजारांहून अधिक ऑप्टिकल सेन्सर असतील. 2300 फुट उंचीवर 1211 स्ट्रिंग्सच्या मदतीने हा टेलिस्कोप समुद्रात फिट केला जाणार आहे. याचा एक भाग हा समुद्राच्या बाहेरच्या दिशेला असणार आहे. 7.5 क्यूबिक किलोमीटर परिसरात हा टेलिस्कोप घोस्ट पार्टिकल्सचा शोध घेणार आहे. 
न्यूट्रिनो हे फोटॉन नंतर, हे विश्वातील सर्वात सामान्यपणे आढळणारे उप-अणु कण आहेत. ताऱ्यांच्या अणुस्फोटातून  किंवा सुपरनोव्हा स्फोटातून याची उत्पत्ती झाली आहे. 1956 मध्ये प्रथम  संशोधकांनी न्यूट्रिनो बाबतचे संशोधन समोर आले. या दुर्बिणीच्या मतदीने न्यूट्रिनो बाबत अधिक संशोधन केले जाणार आहे.