नवी दिल्ली : चीनची जमीन हडपण्याची भूक शांत होताना दिसत नाहीय. चीनने आता आपला कथित मित्र नेपाळची जमीन देखील हडप केली आहे. चीनने केवळ नेपाळच्या जमीनीवर कब्जाच केला नाहीतर तिथे ९ इमारती देखील बांधल्या. दुसरीकडे चीन नेपाळला आपला जवळचा मित्र म्हणतो.
चीनने नेपाळच्या सरकारला विश्वासात न घेता जमीन हडपली आहे. याठिकाणी ९ इमारती बांधल्या आहेत. नेपाळला याबद्दल कळण्याच्या आतच हे सर्व झाल्याची माहिती समोर आलीय. नेपाळ नागरिकांच्या हद्दीत चीनने घुसण्याचा प्रयत्न केलाय.
लपचा गावचे सरपंच विष्णू बहादूर लामा यांना फिरताना ही घटना निदर्शनास आली. चीनी सैनिकांनी त्यांना रोखलं. चीनी सैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला परत धाडल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या घडीला भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी म्हणून चीनकडून LAC वर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याचं कळत आहे. पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या पँगाँग लेकपाशी असणाऱ्या फिंगर 4 क्षेत्रातील भागात चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये सतत पंजाबी गाणी वाजवण्यात येत आहेत.
भारतीय सैन्याची एकंदर तयारी पाहता चीननं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय सैन्य फिंगर 4 जवळूनच चीनच्या सैन्यावर करडी नजर ठेवून आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ज्या पोस्टवर चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत तेथे चोवीस तास भारताकडून नजर ठेवली जात आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Union Defence Minister Rajnath Singh यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार चीननं लडाख परिसरातील जवळपास ३८००० चौरस किमी भूखंडावर अनधिकृत ताबा मिळवला आहे. जे द्विपक्षीय सामंजस्य कराराचं उल्लंघन आहे. चीनकडून मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेलं सैन्यबळही १९९३ आणि १९९६ च्या करारांचं उल्लंघन ठरत आहे.