दोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या

डासांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार डासांमुळे होतात. डासांचा उपद्रव पाहता लोकं त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. पण डासांनी एका गुन्ह्याची उकल केली असं सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही. 

Updated: Oct 31, 2022, 04:15 PM IST
दोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या title=

Latest Trending News: डासांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार डासांमुळे होतात. डासांचा उपद्रव पाहता लोकं त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. पण डासांनी एका गुन्ह्याची उकल केली असं सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही. डासांनी गुप्तहेराची भूमिका बजावली असं कोणी सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल. हे विचित्र असलं तरी खरं आहे. चीनमधील 2 मृत डासांनी त्यांच्या डीएनएद्वारे चोर पकडण्यात मदत केली. ही बातमी चीनमध्येच नाही तर जगभरात चर्चेत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केल्याने सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये एका घरात चोरी झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते घरात गेले असता त्यांना सांगण्यात आले की दरवाजा आतून बंद आहे. चोरटे बाल्कनीतून घरात घुसले होते. पोलिसांनी तपासणी केली असता किचनमध्ये काही नूडल्स आणि अंड्याचे कवच दिसले. हे पाहून चोरट्यांनी घरातच रात्र काढल्याचा अंदाज पोलिसांना आला.

मालकाला पाहताच बकऱ्यांनी सुरु केला ड्रामा, Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना घरात वापरलेली 1 मच्छराची कॉइल, 2 मेलेले डास आणि भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी तत्काळ भिंतीवरील रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले. डीएनए अहवाल आल्यानंतर हा डीएनए चाय आडनाव असलेल्या संशयित व्यक्तीचा असून त्याचा गुन्हेगारी रेकॉर्डही असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. चोराने ज्या डासांना मारले होते त्या डासांनी अखेर बदला घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.