नवी दिल्ली : डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या तणावावरून एकीकडे चीन सरकार या प्रकरणाला शांततेने सोडवण्याची भाषा करत आहे. तर दुसरीकडे चीनी मीडिया भारतावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीये.
लद्दाखमध्येही भारतीय सीमेत चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताला चिनी परराष्ट्रा खात्याने नाकारले आहे. डोकलामनंतर लद्दाखमध्येही दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आल्याच्या बातम्या आल्या होत्या. नंतर दोन्ही सैन्यांनी शांततेने वाद मिटवण्याचं मत व्यक्त केलं. मात्र, चिनी मीडिया लगातार भारतावर हल्ला करत आहे. आता चीनच्या टीव्ही चॅनलने भारताची खिल्ली उडवली आहे आणि डोकलाम मुद्द्यावर भारताच्या ७ पापांचा पाढा वाचला आहे.
#TheSpark: 7 Sins of India. It’s time for India to confess its SEVEN SINS. pic.twitter.com/vb9lQ40VPH
— China Xinhua News (@XHNews) August 16, 2017
चीनची वृत्तवाहिनी Xinhua News Agency ने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. पहिल्यांदा हा व्हिडिओ चिनी न्यूज एजन्सीचा एक गंमतीशीर शो वाटतो. ज्यात अॅंकर भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असलेल्या डोकलाम मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट करत आहे. या व्हिडिओत भारताकडून काय चुका करण्यात आल्या हे सांगण्यात आले आहे. भारत कसा चुकीच्या पद्धतीने डोकलाममध्ये घुसलाय हे यात सांगण्यात आलंय.
या व्हिडिओत भारतावर आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओत करण्यात आलेले आरोप नवीन नाहीयेत. चिनी मीडियाने वेळोवेळी असेच आरोप केले आहेत. मात्र यावेळी भारत हा एक असा शेजारी आहे जो तुम्हाला न सांगता तुमच्या घरात सैनिक आणि बुलडोजर घेऊन आलाय, असे म्हणण्यात आले आहे.