पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार, एक भारतीय जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा सीमेजवळच्या खेड्यांजवळ गोळीबार

Updated: Jun 14, 2020, 10:30 AM IST
पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार, एक भारतीय जवान शहीद title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सीजफायरचं उल्लंघन करण्यात आलं. पुंछ जिल्ह्यातील किरनी सेक्टरमधील शाहपूरजवळ पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यामुळे एक जवान शहीद झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलेट आणि मोर्टारने पाकिस्तानने भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताने ही पाकिस्तानला यानंतर चोख उत्तर दिलं.

नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानच्या या कारवाईला तीव्र उत्तर दिले आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या बऱ्याच पोस्ट उद्धवस्त झाल्या आहेत.

12 जून रोजी देखील पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर फॉरवर्ड पोस्ट्स आणि खेड्यांमध्ये गोळीबार केला होता आणि युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. सैन्याच्या माहितीनुसार, पाकिस्तानने जवळजवळ एका आठवड्यापासून नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत आहे.

गेल्या गुरुवारी, पाकिस्तानी सैन्याने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. याशिवाय गेल्या एका आठवड्यात अनेक घरांचे नुकसान झाले असून लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.