कॅनेडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Nov 13, 2020, 12:29 PM IST
कॅनेडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या title=

मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेते. सत्य आणि प्रकाश यांचा उत्सव दिवाळी ही 14 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात हा उत्सव लोकप्रिय आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'दिवाळी आपल्याला सत्य, प्रकाश आणि सत्याचा नेहमी विजय याची आठवण करुन देते. आशापूर्ण संदेश आणि हा महत्त्वाचा सण साजरा करण्यासाठी मी संध्याकाळी वर्च्युअल उत्सवात सहभागी झालो होतो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा'

जस्टिन ट्रूडो यांनी ट्विटमध्ये व्हर्च्युअल सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहे.