आपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणारे हे माता - पिता

ही घटना आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील.... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 16, 2018, 06:30 PM IST
आपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणारे हे माता - पिता  title=

कॅलिफोर्निया : ही घटना आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील.... 

घरात आपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणाऱ्या या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केलं आहे. 57 वर्षीय डेविड ऐलन तुरपिन आणि 49 वर्षीय लुइस अन्ना तुरपिन यांना अटक केलं आहे. यांच्या 13 कुपोषित मुले असून यांचे वय 2 वर्षापासून ते अगदी 29 वर्षापर्यंत आहे. 

13 मुलांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा काही मुलं अंधारात पलंगाला बांधलेले होते. अधिकाऱ्यांनी या दाम्पत्याला अटक केलं आहे. यांना सोडण्यासाठी 90 लाख डॉलर भरण्याची गरज आहे. 

घरातून पळून जाण्यात एक मुलगी यशस्वी 

17 वर्षाती मुलगी घरातून पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. तिने 911 या नंबरवर फोन करून हा प्रकार सांगितला. ही मुलगी इतकी कुपोषित आहे की त्यांना वाटलं तिचं वय 10 वर्ष असेल. 

कॅलिफोर्नियाच्या एका घरात या 13 मुलांना कैदेत ठेवले होते. या मुलांना तार आणि चैनने गुंडाळून ठेवले होते. तसेच त्यांच्या अंगाला आणि त्या परिसराला प्रचंड घाणेरडा वास येत होता. मात्र अद्याप मुलांच्याच पालकांनी त्यांना असं का ठेवलं याचं कारण अद्याप सापडलेलं नाही.