व्हिडिओ : वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं पडलं महागात

वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडलंय. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. आणि हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

Updated: Nov 24, 2017, 04:47 PM IST
व्हिडिओ : वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं पडलं महागात title=

नवी दिल्ली : वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडलंय. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. आणि हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

ही घटना चीनमध्ये घडलीय. पिंजऱ्यात बसलेल्या वाघाला अन्न देण्यासाठी पिंजऱ्यात हात टाकून एक मांसाचा तुकडा टाकला... त्याक्षणी पिंजऱ्यात बसलेल्या वाघानं आपलं तोंड हाताकडे वळवून व्यक्तीचा हात आपल्या तोंडात पकडला. 

त्यानंतर जवळपास तीन मिनिटे या व्यक्तीचा हात वाघाच्या जबड्यात होता... वेदनेनं तो विव्हळत होता... आजुबाजुला जमलेल्या लोकांपैंकी एकानं वाघाला लाकडानं डिवचल्यानंतर वाघानं या व्यक्तीचा हात सोडला. त्यानंतर हा व्यक्ती बेशुद्ध होऊन खाली पडला.  

या घटनेनंतर जखमी व्यक्तीला तत्काळ हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा एका सर्कशीतला वाघ आहे.