बस नदीत उलटून १४ जणांचा मृत्यू....

बिहार नेपाळच्या सीमेवर प्रवाशांनी भरलेली एक बस नदीत पडल्याची घटना समोर आली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 28, 2017, 08:05 PM IST
बस नदीत उलटून १४ जणांचा मृत्यू.... title=

काठमांडू : बिहार नेपाळच्या सीमेवर प्रवाशांनी भरलेली एक बस नदीत पडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या बसमधून सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. काठमांडूला जाणारी ही बस सुमारे ८० किलोमीटर दूर घाटावरून वळवताना नदीत पडली. 

धाडिंगचे पोलीस अधीक्षक ध्रुबराज राऊत यांनी सांगितले की, आतापर्यँत नदीतून ५ महिला आणि २ लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र त्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही. 

हाती आलेल्या वृत्तानुसार, यातून १५ जण नदीतून पोहून सुरक्षित बाहेर पडले. दुर्घटनेत ते किरकोळ जखमी झाले. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवास करणाऱ्या प्रवाशांबद्दल लगेचेह कोणती माहिती हाती लागली नाही आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवासी बसमध्ये अडकल्याची शक्यता आहे आणि त्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मात्र सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.