मुंबई : एका प्रेमी जोडप्यांचं नात हे खूप घट्टं असतं. त्यांच्या नात्यावर अनेक चित्रपट, पुस्तकं आणि कविता केल्या गेल्या आहेत, ज्यावरुन आपल्या प्रेमाची खरी किंमत, त्याचे महत्व आणि त्याची महानता समजते. प्रेमाबद्दल असे ही म्हटले जाते की, खरं प्रेम केवळ भाग्यवान लोकांनाच मिळते. परंतु त्यांपैकी, ज्यांना खरे प्रेम मिळते त्यांना या प्रेमाची जाणव नसते.
जर प्रेमाच्या तिन वर्षांनंतर, एखादा प्रियकर किंवा प्रेयसीने त्याच्या जोडीदाराला फसवले किंवा धमकी देली असेल तर? तर यात दोष नक्की कोणाचा? हा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. कारण, अशा एका नात्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
एक मीडिया वृत्तानुसार ब्रिटनमधील हे धक्कादायक प्रकरण सर्वांसमोर आले आहे. ज्यामुळे 3 वर्षाच्या प्रेमावर प्रश्न चिन्ह उपस्थित राहिले आहेत. येथे लॉकडाऊन दरम्यान एका प्रियकराने त्याचे काही व्हिडीओ एका 'गे साइट'वर अपलोड केले. होते.
अचानक एके दिवशी जेव्हा त्याच्या प्रेयसीने हे व्हिडीओ पाहिले, तेव्हा तिने तिथून ते रेकॉर्ड केले आणि आपल्या फोनमध्ये ठेवले. आता ती मैत्रीण हा व्हिडीओ त्याच्या बॉसला पाठवण्याची धमकी देत आहे.
त्रासलेल्या प्रियकराने लव्ह गुरूकडे सल्ला मागितला असता, ही गोष्ट सर्वांसमोर आली. प्रियकर म्हणाला, "मी 26 वर्षांची आहे आणि माझी मैत्रीण 24 वर्षांची आहे. जेव्हा तिने माझे व्हिडीओ एका वेबसाइट पाहिले तेव्हा ती अस्वस्थ झाली. मी साइटवरून काढण्यापूर्वी तिने या सर्व क्लिप्स आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केल्या आणि त्या आपल्या भावांकडे पाठवल्या. मी तिची माफी मागितली आणि म्हंटले की, हे ती खूप चुकीचं करतेय."
आता लव्ह गुरूने या प्रेमीला घाबण्याऐवजी परिस्थितीचा सामना करण्याचा सल्ला दिला आहे. लव्ह गुरू म्हणाला, "तुझ्या मैत्रिणीने तुझ्या परवानगीशिवाय व्हिडीओ शेअर केला तर, अशा वेळी तिच्याविरूद्ध खटला सुरू होऊ शकतो. तिची कारवाई बेकायदेशीर आहे. असे समोरच्याला न विचारता त्याचे फोटो किंवा एखादी महत्वाची गोष्ट शेअर करणे हा एक गुन्हा आहे. हे तिला समजावून सांग, कारण जर ती तुमच्यावर खरोखरच प्रेम करत असेल, तर भविष्यात ती असे काहीही करणार नाही. जे तुला इजा करु शकते. यानंतरही, जर तिला तुझी समस्या समजत नसेल, तर तुम्ही तुमचे नाते संपवने योग्य ठरेल जे तुमच्या दोघांसाठी चांगले असेल."