मुंबई : समुद्राच्या पाण्याशी खेळ करु नका, असं अनेकदा सांगितलं जातं. मुळात पाण्याशी खेळ नको हाच त्यामागचा हेतू. पण एक असा समुद्रही आहे जिथं कोणी अपघातानेही बुडत नाही. बसला ना धक्का?
हे खरं आहे. समुद्राच्या प्रेमात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात या आगळ्यावेगळ्या अथांग सागराला भेट देण्याची इच्छा कायम असते. या समुद्राचं नाव आहे, Dead Sea म्हणजेच मृत सागर. जॉर्डन आणि इस्रायल या देशांमध्ये हा मृत सागर सा-या जगाचं लक्ष वेधून घेतो.
हा समुद्र जगातील सर्वात खोल तलावाच्या रुपातही ओळखला जातो. असं म्हणतात की या समुद्राच्या पाण्यात वाढही होते. पण, पाण्यात असणारं मीठाचं प्रमाण पाहता त्या दबावामुळे कोणीही बुडत नाही. हा समुद्र असंख्य पर्यटकांना खुणावणारं एक ठिकाण आहे.
समुद्र तळापासून सर्वात खाली म्हणजेच 1388 फूट पृथ्वीच्या सर्वात खालच्या केंद्रावर मृत सागर स्थिरावला आहे. जवळपास 3 लाख इतकं वय असणाऱ्या या समुद्रात खालून वरच्या दिशेने होतो, त्यामुळेच या समुद्रत सरळ झोपलं तरीही त्यात कोणीही बुडत नाही.
Dead sea हे नाव का?
या समुद्रात मीठाचं प्रमाण इतकं जास्त आहे की यामध्ये कोणताही जीव जगत नाही. कोणतही झाड, वेल अथवा मासाही यामध्ये जगत नाही. या समुद्राच्या पाण्यात पोटॅश, मॅग्नेशियमची मात्राही आहे, त्यामुळेच या समुद्रातून निघणाऱ्या मिठाचा वापरही सहसा केला जात नाही. इतर समुद्राच्या तुलनेत मृत सागराच्या पाण्यातील मिठाच प्रमाण 33 टक्के जास्त आहे, ज्यामुळे यामध्ये आंघोळ केल्याने अनेक आजारही दूर होतात असा दावा केला जातो.
काय सांगताय! समुद्राचं नावच Dead Sea, पण यात कोणच बुडत नाही.