ज्या मुलीसोबत करणार होता विवाह, ती निघाली भावाची...

होणाऱ्या पत्नीचे सत्य जेव्हा कळालं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Updated: Oct 2, 2022, 05:17 PM IST
ज्या मुलीसोबत करणार होता विवाह, ती निघाली भावाची... title=

मुंबई : लग्न ही आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. पण ज्या मुलीसोबत लग्न होणार आहे. ती मुलगी जेव्हा एक मोठं सत्य लपवून ठेवते आणि जेव्हा ते समोर येतं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. होणाऱ्या पत्नीने गेल्या 6 वर्षांपासून ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली होती. आता त्याला त्या मुलीसोबत लग्न करावे की नाही हे कळत नाहीये. त्याने ही गोष्ट थेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने म्हटले की, त्याची होणारी पत्नी आधीच गरोदर आहे. त्यामुळे लवकर लग्न करण्यासाठी घरच्यांकडून दबाव आहे.

एका तरुणाला आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दलचे सत्य कळाले त्याला तेव्हा ही धक्का बसला. जॉन नावाच्या तरुणाने Reddit वर लिहिले की त्याला अलीकडेच कळले की त्याची होणारी पत्नी त्याच्या भावाची गर्लफ्रेंड होती. हे कळल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण होणाऱ्या पत्नीने कधीच त्याला हे सत्य सांगितले नव्हते.

जॉनच्या भावाचे त्याच तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. जॉनने पुढे सांगितले की, तो आणि त्याची होणारी पत्नी गेल्या अडीच वर्षांपासून एकत्र आहेत. अवघ्या 5 महिन्यांपूर्वीच त्यांची एंगेजमेंट झाली होती. सध्या मंगेतर गरोदर आहे, त्यामुळे लवकरच लग्न करण्यासाठी घरच्यांकडून दबाव आहे. पण त्याला मंगेतराच्या अफेअरची माहिती मिळाल्याने त्याला काय करावे हे समजत नाही.

जॉनच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याला ही विश्वास बसला नाही, पण जेव्हा होणाऱ्या पत्नीच्या एका मित्राने चॅटचे स्क्रीनशॉट आणि काही फोटो शेअर केले तेव्हा जॉनचा विश्वास बसला.

या प्रकरणावरून जॉनचा त्याच्या भावाशी वादही झाला होता. हे कोणालाही सांगू नको, असे त्याने सांगितले. कारण त्याचा भाऊ विवाहित आहे, यामुळे त्याचे आयुष्य खराब होऊ शकते.