Viral News : लपाछुपी (playing hide and seek) हा लहान मुलांचा आवडता खेळ. लपाछुपी खेळता खेळता एक 15 वर्षांचा मुलगा परदेश वारी करुन आला आहे. बांग्लादेशात (Bangladesh) लपाछुपी खेळता खेळता लपलेला मुलगा थेट मलेशियात (Malaysia) सापडला मुलगा आहे. हा विचित्र प्रकार पाहून सगळेच झाले शॉक आहेत. हा मुलगा मलेशियात कसा पोहचला यामागची कहाणी देखील खूपच इंटरेस्टींग आहे.
लपाछपी खेळता खेळता 15 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झालाय तब्बल सहा दिवस हा मुलगा गायब होता. या सहा दिवसांमध्ये हा मुलगा तब्बल 3700 किमी प्रवास करुन एका देशातून थेट दुसऱ्या देशात पोहचला. खेळता खेळता हा मुलगा अचानक दिसेनाशा झाला सगळीकडे शोधे घेऊन तो कुठेच सापडला नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर हा मुलगा सापडला आणि त्याचा जीव बचावला आहे.
न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. बांग्लादेशात राहणारा हा मुलगा 15 वर्षांचा आहे. फहीम असे त्याचे नाव आहे. फहीम आपल्या मित्रांसह चितगाव बंदरात त्याच्या काही मित्रांसोबत लपाछपी खेळत होता. खेळता खेळता फहीम येथून अचानक गायब झाला.
लपाछपी खेळताना आपण बाद होऊ नये यासाठी फहीम एका शिपिंग कंटेनरमध्ये लपला. कंटेनरचे दार देखील त्याने आतून लावून घेतले. येथे लपलेला असताना फहीमला झोप लागली आणि तिथेच सगळा. फहीम बांगलादेशातून मलेशियाला पोहोचला होता. याची माहिती ना त्याच्या कुटुंबीयांना होती ना बंदरावर काम करणाऱ्या लोकांना.
तब्बल सहा दिवस फहीम कंटेनरमध्ये अडकला होता. सहा दिवसांनंतर मलेशिया बंदरात कंटेनर उघडला असता आतमध्ये एक मुलगा पाहून तेथील कर्मचारी थक्क झाले. चौकशीत फहीमने आपण बांगलादेशचा रहिवासी असल्याचे सांगितले. यानंतर मलेशियाच्या बंदर अधिकाऱ्यांनी चितगाव बंदराला याबाबत माहिती दिली. त्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. अन्यथा हे प्रकरण मानवी तस्करीचे असू शकते, असे यापूर्वी मलेशियाच्या बंदर अधिकाऱ्यांना वाटत होते.
कंटेनरमध्ये अडकलेल्या फहीम तब्बल सहा दिवस अन्न पाण्याशिवाय राहिला. संपूर्ण सहा दिवस भुकेने आणि तहानेमुळे व्याकुळ होऊन फहीम अशक्त झाला होता. मलिशियामध्ये कंटेनरमधून बाहेर काढल्यावर बंदर अधिकाऱ्यांनी सर्व प्रथम त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर फहीमची प्रकृती स्थिर झाली.