पाकिस्तान मशिदीत बॉम्बस्फोट, 30 ठार 50 जखमी

Bomb blast in Pakistan : ​पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 जण ठार झालेत.

Updated: Mar 4, 2022, 04:01 PM IST
पाकिस्तान मशिदीत बॉम्बस्फोट, 30 ठार 50 जखमी title=

इस्लामाबाद : Bomb blast in Pakistan : पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 30 जण ठार आणि 50हून अधिक जखमी झाले, अशी माहिती जिओ न्यूजने दिली आहे.

लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सांगितले, या ठिकाणी जखमींना आणण्यात आले आहे. त्यांनी रॉयटर्सला सांगितले की त्यांना 30 हून अधिक मृतदेह मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वायव्य पाकिस्तानी शहरात शुक्रवारच्या सभेदरम्यान गर्दीने भरलेल्या शिया मशिदीमध्ये बॉम्ब घडवून आणला गेला. यात किमान 50 जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 10 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका मदत करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीमध्ये आज शुक्रवारी नमाज पडण्यात येत होता. त्यावेळी हा स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी तात्काळ कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

पेशावर येथील पोलीस अधिकारी इजाज अहसान यांनी सांगितले की, दोन हल्लेखोरांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला आणि पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलीस ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर हा स्फोट झाला, असेही त्यांनी सांगितले.