नवी दिल्ली : डोकलाम विवादावर चीन कोणत्याही परिस्थितीत भूटानला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार भूटान कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ नाही सोडणार. कारण त्याला भीती आहे की, या विवादानंतर चीनी सेना राजधानी थिम्पूला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करु शकते.
भूटान कधीही भारताची साथ नाही सोडणार. भूटानवा डोकलाम पठारवर भारताप्रमाणेस भीती आहे. जर चीनी सैनिक डोकलामसह विविध विवादित भागावर दावा करतो तर तो हिमालयाच्या उंची भागावर देखील ताब्यात घेईल. यामुळे भूटानची हा, पारो आणि थिम्पू घाट चीनच्या ताब्यात येतील. यामुळे भारतातून भूटानला होणाऱ्या अन्न पुरवठ्याच्या मार्गावर अडचणी निर्माण होऊ शकतात.
डोकलाम पठारावर पूर्व भूटानपासून 495 स्क्वेयर किलोमीटर आणि पश्चिमी सेक्टरच्या 286 स्क्वेयर किलोमीटर आपल्या दावा करत आहे. चीनने पूर्व भूटानवरुन आपला दावा मागे न घेता भूटानलाच डोकलाम पठार चीनला सोपवण्याची मागणी केली आहे. यामुळे चीनला भारताविरोधात कमांडिंग पोजिशन मिळेल. भूटानकडून चीनची ही मागणी मान्य होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. डोकलामसह चीनी सेना भूटानच्या अन्य भागातही आपलं वर्चस्व स्थापित करु शकते. ज्यामुळे भूटानच्या अडचणी वाढू शकते.