व्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान

रशियात राष्ट्रपती पदासाठी रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकालही लागला. व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा राष्ट्रपती बनले. पण, या सर्व घडामोडीत एका अस्वल मात्र भलतेच चर्चेत आले. या अस्वलाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 20, 2018, 06:00 PM IST
व्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान title=

मॉस्को : रशियात राष्ट्रपती पदासाठी रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकालही लागला. व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा राष्ट्रपती बनले. पण, या सर्व घडामोडीत एका अस्वल मात्र भलतेच चर्चेत आले. या अस्वलाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे.

उपस्थितांची झाली करमणूक

अर्थात, एखाद्या निवडणुकीत अस्वल कसे काय मतदान करू शकते? हा सवाल सहाजिकच आपल्या मनात निर्माण झाला असेल. पण, हे अस्वल म्हणजे खरोखरचे अस्वल नव्हे बरं. तर, राष्ट्रपती पदासाठी मतदान करताना एक मतदार चक्क अस्वलाच्या वेशात आले.  मतदाराचा हा अवतार पाहून उपस्थित इतर मतदारांची चांगलीच करमणूक झाली.

अस्वलाला मतान कक्षात घुसताच नाही आले

ही घटना रशियाच्या बरयेतियायेथील एका मतदान केंद्रावर घडली. अर्थात या अस्वलाला मतदान कक्षात पूर्णपणे जाता आले नाही. मात्र, हे अस्वल मतदान करण्यात मात्र यशस्वी झाले.