EVM हद्दपार! आता बॅलेट पेपरवर होणार मतदान; लोकसभा निवडणुकांसाठी सरकारची मोठी घोषणा

Ballot Paper : भारतात प्रत्येत निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम हटावच्या घोषणा दिल्या जातात. मात्र प्रत्येक वेळी सरकारकडून ही मागणी अमान्य केली जाते. दुसरीकडे आता शेजारच्या बांग्लादेशात आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होणार आहेत

Updated: Apr 6, 2023, 10:48 AM IST
EVM हद्दपार! आता बॅलेट पेपरवर होणार मतदान; लोकसभा निवडणुकांसाठी सरकारची मोठी घोषणा title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Ballot Paper : देशात एकीकडे विरोधकांसह काही प्रमाणात सामान्य जनतेमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका (Election) घेण्याची मागणी सातत्याने केली जात असते. लोकसभा, विधानसभासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता शेजारच्याच देशात पुन्हा बॅलेट पेपवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतात 2019 मध्ये जेव्हा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने (Election Commission) यापुढे मतदानासाठी (Voting) बॅलेट पेपरचा वापर होणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. तसेच त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आता ईव्हीएमवरच (EVM) निवडणूक घेण्यात येईल असं स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे आता बांग्लादेशात पुन्हा एकादा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत.  बांगलादेशच्या (Bangladesh) शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या सरकारने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करण्याचे ठरवले आहे. शेख हसीना यांच्या सरकारने ईव्हीएम काढून टाकण्याची आणि बॅलेट पेपरद्वारे देशात लोकसभा निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी मान्य केली आहे.

बांगलादेश निवडणूक आयोगाने (BEC) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या आगामी 12व्या संसदीय निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) वापरली जाणार नाहीत. बीएनपीसह प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरास जोरदार विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशात वर्षाच्या शेवटी निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार असून पुढील वर्षी जानेवारीत मतदान होणार आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएम रद्द करण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र, बांगलादेशात सर्वच मतदारसंघात ईव्हीएमचा वापर केला जाणार नाही. 

बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीसह प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे बांगलादेशातील सर्व 300 संसदीय मतदारसंघात मतपत्रिका आणि मतपेट्या वापरल्या जाणार आहेत. बांगलादेश निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय  विश्लेषकांनी म्हटलं आहे की, जुन्या कागदी मतपत्रिका परत आणल्याने लोकशाही मूल्ये बळकट होणार आहेत.

ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि लोकांनी याला विरोध सुरु केला होता. बांगलादेशातील विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर गेल्या निवडणुकांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भविष्यात निवडणुका घेऊन निरपेक्ष सरकार स्थापन करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.