मुंबई : प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. आई झाल्यावर स्त्रीला आपला जास्तित जास्त वेळ हा आपल्या मुलांकडे द्यावा लागतो. ज्यामुळे बऱ्याचदा तिला कामाकडे फारसा वेळ द्यायला भेटत नाही. तसेच जर ती स्त्री वर्किंग वूमन असली तर, मग बऱ्याचदा तिला आपल्या मुलांसाठी काम देखील सोडावं लागतं. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका स्त्रीची ओळख करुन देणार आहोत. ज्या स्त्रीने आपल्या आईपणाच्या भावनेतून एक असं काम शोधून काढलं ज्याची खूप मागणी आहे.
आम्ही ज्या स्त्रीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव साफिया रिहाद आहे. साफिया ही लंडनमध्ये राहाते आणि लॉकडाऊनच्या काळात तिने हे काम सुरु केले होते. तिला तीन मुले आहेत, ज्यामुळे एका आईला आपल्या मुलाबद्दल काय पाहायला आवडेल किंवा कोणती आठवण जवळ ठेवायला आवडेल, या भावनेतून तिने आईच्या दुधापासून तयार होणारे दागिने बनवायला तयार केले आहे आणि जगभरातून याला मागणी देखील आली. ज्यामुळे ही महिला कोट्यवधी रुपये कमवू लागले आहेत.
ही महिला तिचा पती ऍडम रियादसोबत मॅग्नेटा फ्लॉवर नावाची कंपनी चालवते. ती दागिन्यांच्या या बिझनेसमधून कोट्यवधी रुपये कमवू लागले आहेत. आता तिची कंपनी 2023 पर्यंत 15 कोटींचा व्यवसाय करू शकते. सफायाला लॉकडाऊनमध्ये एक लेख सापडला ज्याने तिला कल्पना दिली आणि तिने हे काम करायला सुरूवात केली.
या महिलेला अशी कल्पना सुचली, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे आणि तिच्या कल्पनेला खूप दादही मिळत आहे. अनेकजण पदवी घेऊन शिक्षणासाठी बसले आहेत, परंतु प्रत्येकजण करोडो कमावण्याचा विचारही करत नाही.
करोडोंची कमाई करण्यासाठी लोकांना पापड लाटावे लागतात. पण तरीही बऱ्याचदा त्याचे फळ मिळत नाही. पण हुशार लोक या सगळ्याच्या मागे धावत नाहीत. त्यांना फक्त त्यांची कल्पना प्रत्यक्षात आणायची आहे.