जगाचा अंत झाला, तरी 'त्यांचं' अस्तित्वं कायम असेल; Baba Vanga यांची भविष्यवाणी खरी ठरणार?

पुतिन यांच्याविषयी काय म्हणालेले Baba Vanga? 

Updated: Sep 30, 2022, 10:45 AM IST
जगाचा अंत झाला, तरी 'त्यांचं' अस्तित्वं कायम असेल; Baba Vanga यांची भविष्यवाणी खरी ठरणार?  title=
Baba Vanga shocking Predictions russia ukrain war vladimir putin

Baba Vanga Prediction On Putin: (Russia) रशिया आज (30 September) औपचारिकरित्या युक्रेन (Ukraine)च्या चार भागांवर ताबा मिळवणार आहे, जिथं जनमत करार करण्यात आला आहे. पाश्चिमात्य देशांच्या (Western Countries) म्हणण्यानुसार युक्रेनच्या या चार महत्त्वाच्या भागांवर ताबा मिळाल्यानंतरही हे युद्ध थांबणार नाहीये. उलटपक्षी रशिया आणखी एखादी मोठी खुरापत करु शकतो अशी भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे. इतकंच नव्हे, ही परिस्थिती पाहता अमेरिका आणि काही पाश्चिमात्य देश आणि रशिया एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात असंही सांगण्यात आलं आहे. या साऱ्यामध्ये आता तिसऱ्या महायुद्धाचा (Third World War) वणवा भडकण्याती शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

बल्गेरियाच्या भविष्यवक्त्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी वर्तवलेल्या अंदाजाकडे यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं. व्लादिमीर पुतिन आणि रशियासंदर्भात त्यांनी बऱ्याच भविष्यवाणी केल्या होत्या. त्यानुसार 7 महिन्यांपासून या Russia Ukraine War सुरु आहे. 

तिसऱ्या विश्वयुद्धाविषयी काय म्हणाले होते बाबा वेंगा? 
बाबा वेंगा यांनी तिसऱ्या विश्वयुद्धाविषयीसुद्धा भविष्यवाणी केली होती. त्यानुसार  रशिया जगातील एकमेव महासत्ता असेल,तिसऱ्या विश्वयुद्धात अणुबॉम्बचा (Atom Bomb) वापर होईल. रशिया आणि युक्रेन युद्धात या पार्श्वभूमीवर अनेकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकीही देण्यात आली आहे. 

पुतिन यांच्याविषयी काय म्हणालेले Baba Vanga? 
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन जगातील सर्वात बलशाली व्यक्तींपैकी एक असलीय शिवाय त्यांचं जगावर अधिपत्य असेल, जगाचा अंत होईल तेव्हा एकच गोष्ट अस्तित्वात असेल ती म्हणजे व्लादिमीर यांचा गौरव. रशिया ‘Lord of the World’ असेल. 

कोण होते बाबा वेंगा? 
बाबा वेंगा एक महिला होत्या. त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला होता. त्यांना दिसत नव्हतं. वयाच्या 12 व्या वर्षी एका दुर्घटनेमध्ये त्यांनी दृष्टी गमावली होती. असं म्हणतात की त्या नेत्रहिन असल्या तरीही त्यांची भविष्य पाहण्याची दृष्टी मात्र कुणीही हिरावू शकलं नव्हतं.