2023 मध्ये पृथ्वीचा वेग बदलेल! Baba Vanga यांची भविष्यवाणी...

Baba Vanga:  2022 च्या भविष्यवाण्यांमध्ये भारतासाठी (India) धोकादायक भाकीतही वर्तवण्यात आलं आहे.

Updated: Oct 1, 2022, 10:32 AM IST
2023 मध्ये पृथ्वीचा वेग बदलेल!  Baba Vanga यांची भविष्यवाणी...
baba vanga predictions 2022 2023 2028 to 2046 nm

Baba Vanga Predictions: बल्गेरियाच्या भविष्यवक्त्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी वर्तवलेल्या अंदाजाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बाबा वेंगा आपल्या भविष्यवाणीसाठी जगभरात ओळखले जातात. बाबा वेंगा यांनी 2022 साठी केलेली भविष्यवाणी खरी ठरतं आहे. त्यामुळे त्यांचा भविष्यवाणीकडे सर्वांचं लक्ष लागून असतं. आता त्यांनी  2023-46 पर्यंत भविष्यवाणी केली आहे, जे ऐकून सर्व जगाला धक्का बसला आहे. (baba vanga predictions 2022 2023 2028 to 2046 nm )

हे वर्ष संपायला 3 महिने बाकी आहे, त्यामुळे या बाबा वेंगा यांनी या वर्षांमध्ये जे भाकीत केलं आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, 2022 हे वर्ष भारतासाठी (India) धोकादायक ठरू शकतं. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि अनेक आशियाई देशांमध्ये भीषण पूर आणि अनेक देशांमध्ये दुष्काळामुळे त्यांना पाण्याची कमतरता भासेल, असं भाकित केलं होतं, ती खरीही ठरली. 

हवामान बदलामुळे युरोप अजूनही दुष्काळ आणि तीव्र उष्णतेने त्रस्त आहे. ऑस्ट्रेलिया आणि अनेक आशियाई देशांमध्ये भीषण पूर आल्याने आणि अनेक देशांमध्ये दुष्काळामुळे पाणीटंचाईचा अंदाज त्यांनी वर्तवला.

2022 च्या भविष्यवाण्यांमध्ये भारतासाठी (India) धोकादायक भाकीतही वर्तवण्यात आलं आहे. 2022 मध्ये जगभरात तापमानात लक्षणीय घट होईल आणि टोळांचा प्रादुर्भावही झपाट्याने वाढेल, ज्यामुळे अनेक देशांमध्ये अन्न संकट अधिक गडद होईल. हे संकट भारतावरही ओढवणार आहे. 

बाबा वेंगा यांनी ग्रहांबद्दही भाकीत केलं आहे.  जगात काय घडेल याचा अचूक अंदाजही बाबा वांगे यांनी सांगितला आहे. त्यांचा भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये पृथ्वीच्या (Earth)  कक्षेत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे आता पृथ्वी आपल्या कक्षेत पुढे सरकणार का हे पाहायचं आहे.

तर 2028 मध्ये अंतराळवीर शुक्र (Venus) ग्रहावर प्रवास करण्यात यशस्वी होतील, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. शुक्र आणि पृथ्वी हे दोन्ही एकाच आकाराचे ग्रह आहेत, पण शुक्राचं तापमान इतकं जास्त (Temperature of Venus) आहे की त्यामुळे येथील जीवनाच्या सर्व शक्यता संपुष्टात येतात, त्यामुळे हे भाकीत खरंच खरं ठरेल का हे पाहणं औत्सुकाचं असणार आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकणार आहे. मात्र, जसजशी वर्षे वाढत आहेत तसतसे माणसाचं वय कमी होत आहे. आजच्या जगात 60 वर्षे म्हणजे आपण 90 वर्ष जगलो असं समजायला हवं. त्याचवेळी बाबा वेंगाच्या औषधाच्या क्षेत्रात असा अंदाज आला आहे की विश्वास बसणे कठीण आहे.