Turkey Earthquake Baba Venga Prediction: तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्याआकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. भाकीतं आणि भविष्यवाणी यावर काही जणांचा विश्वास असतो, तर काही याला मानत नाहीत .
पण काही गोष्टी अशा आहेत आपण कितीह i नाकारल्या तरी त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. बाबा वेंगा (Baba Venga) सर्वानाच माहित असतील, यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba venga prediction about turkey massive Earthquake) यांच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती, जी खरी ठरली तर पृथ्वीवर कहर होईल. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत.
बाबा वेंगा याच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होऊ शकते आणि यादरम्यान अणुहल्ला होऊ शकतो. यामुळे पृथ्वीवर मोठा उद्रेक होऊ शकतो. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीला ( (Baba venga prediction about turkey massive Earthquake)) रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाशी जोडून तज्ज्ञ पाहत आहेत आणि असे मानलं जात आहे की ते पुढील वर्षी तिसऱ्या महायुद्धाचे रुप धारण करु शकते.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ज्यानंतर पृथ्वीची कक्षा बदलू शकते आणि पृथ्वीवर इतर अनेक मोठे बदल होऊ शकतात. या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम म्हणजे भूकंप, वादळ सारख्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. असे बाबा वेंगा यांनी सांगितले होते.
बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये जैविक शस्त्रांच्या हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा हल्ला कोण करणार आणि कोणावर हा हल्ला करण्यात येणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. यासोबतच बाबा वेंगा यांनी सौर वादळांबाबत म्हणजेच सौरमालेतील वादळांचीही भविष्यवाणी केली होती.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही