कॅनबेरा : प्रसारमाध्यमाना बातम्या पुरविणारी आणि ८५ वर्षांपासून जुनी असणारी ऑस्ट्रेलियन असोसिएट प्रेस (एएपी) ही न्यूज एजन्सी (Australian Associated Press news agency) जूनपासून बंद होणार आहे. ही घोषणा एएपीने मंगळवारी केली आहे. त्यानंतर 'एएपी बचाव' अशी मोहीम पाठिराख्यांनी केली आहे. दरम्यान, ही वृत्तसंस्था बंद पडल्यावर सुमारे अनेकांचा हातचा रोजगार जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन असोसिएट प्रेस बंद होण्याचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. मोफत ऑनलाईन मजकूर वाढला आहे. त्यामुळे व्यवसायात फायदा होत नाही, असा युक्तिवाद वृत्तसंस्थेने केला आहे. वृत्तसंस्था बंद पडल्यावर जवळपास १८९ लोकांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे.
Australian Associated Press journalists look on as bureau chief Paul Osbourne (C) holds his head after being that AAP will be closing on June 26th at Parliament House in Canberra #saveaap # pic.twitter.com/YWxe3j6eap
— Mick Tsikas (@AAPMick) March 3, 2020
'एएपी' बंद करण्याचा निर्णय अत्यंत अवघड आहे. एएपीची न्यूजवायर सर्व्हिस १९३५ पासून क्षेत्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे, प्रसारक आणि डिजिटल संपादकांना लेख तसेच वृत्तसामग्री उपलब्ध करत आहे. एएपी २६ जून रोजी स्वतःची अंतिम सेवा पुरविणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रूस डेव्हिडसन यांनी दिली आहे. कीथ मर्डोक यांनी १९३५ मध्ये एएपीची स्थापना केली होती.
एएपी पत्रकारितेतील ८५ वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर बंद होणार आहे. हा आमच्यासाठी दुःखद दिवस असणार आहे. या परिवाराची सदैव आठवण येत राहील, असे वृत्तसंस्थेचे संपादक गिलीस यांनी ट्विट केले आहे. न्यूजवायर कंपनी बंद पडल्याने प्रसारमाध्यमांमधील वैविध्याला फटका बसेल. तसेच आपल्याजवळ पत्रकारितेशिवाय दुसरे काहीच नाही, असे ते म्हणालेत.