मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा मोठा वाटा आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री स्टिव्ह किओबे यांनी हे उद्गार काढले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेतील आणि पर्यटन व्यवसायातील एक महत्त्वाचा भागीदार असा उल्लेख करत भारताबाबत बोलताना स्टिव्ह किओबे म्हणाले, आर्थिक वर्ष २०२० मध्ये ऑस्ट्रेलियातील भारतीय पर्यटकांचे योगदान १.९ अरब डॉलरवर पोहोचेल. आर्थिक वर्ष २०१६/१७ मध्ये ऑस्ट्रिलयामध्ये भारतून तब्बल २७४५०० पर्यटक आले. तर, २०१५/१६च्या तुलनेत हे प्रमाण १५.३ इतके अधिक आहे. या पर्यटकांनी ऑस्ट्रेलियात आल्यावर तब्बल १.३ डॉलरपेक्षाही अधीक खर्च केल्याचेही किओबे यांनी सांगितले.
किओे यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकॉम टर्नबुल यांच्या सरकारने ऑस्ट्रेलियातील पर्यटन उद्योगात भारताचे महत्त्व समजून घेतले आहे. त्या दृष्टीने मॅलकॉम टर्नबुल सरकारने भारतीयांना ऑनलाईन वीजा आवेदन देण्याची सुविधाही सुरू केल्याचे किओबे यांनी सांगितले.