Adventure : 48 व्या वर्षी गुहेत गेली, 50 व्या वर्षी बाहेर आली; तुफानी करण्याच्या नादात ‘या’ महिलेनं स्वत:ला एकटं डांबलं आणि...

Human Experiment : गुहेतच साजरा केला वाढदिवस... कसं जगली असेल आयुष्य? जगाशी नातेसंबंध तोडून गुहेत राहिलेली महिला अखेर बाहेर आली. ती बाहेर येताच जगासमोर आलं असं वास्तव, ज्याचा विचारही कुणी केला नसावा...

सायली पाटील | Updated: Apr 16, 2023, 02:35 PM IST
Adventure : 48 व्या वर्षी गुहेत गेली, 50 व्या वर्षी बाहेर आली; तुफानी करण्याच्या नादात ‘या’ महिलेनं स्वत:ला एकटं डांबलं आणि...  title=
(छाया सौजन्य- ट्विटर) / Athlete spent 500 days in a cave for human experiment see photos

Human Experiment : काही मंडळींना साचेबद्ध आयुष्य जगायचं नसतं. ही मंडळी मग वेगळ्या वाटा निवडतात आणि त्या वाटांचे वाटसरु होत संपूर्ण जगाच्या नजरा वळवतात. अशाच काहीशा वाटेवर एक महिला निघाली आणि दोन वर्षांसाठी तिनं या जगाशी असणारं नातं तोडलं. ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरीही हे खरं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी ती एका गुहेत गेली आणि 50 वर्षाची झाल्यानंतर तीनं गुहेबाहेर पाऊल ठेवलं.

इतरांशी कमीत कमी संपर्कात येण्याला प्राधान्य देत स्पेनच्या या 50 वर्षीय extreme athlete नं 500 दिवसांसाठी हे आव्हान स्वीकारत स्पेनच्या ग्रॅनडा शहराबाहेर असणाऱ्या 230 फूट खोल गुहेत राहण्याची किमया केली.

गिर्यारोहणात सराईत असणाऱ्या Beatriz Flamini नं जेव्हा गुहेच्या बाहेर पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद काही औरच होता. वेळ इतका क्षणात गेला की, लक्षातच आलं नाही असं म्हणत आपली गुहेबाहेर यायची इच्छा नसल्याचं ती माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली.

जेव्हा काही मंडळी आपल्याला गुहेबाहेर काढण्यासाठी आले होते तेव्हा, अजून पुस्तक संपलं नसल्याचं म्हणत तिनं मिश्किलपणे गुहेबाहेर येण्यास नकारही दिला. फ्लॅमिनीच्या गटातील काही सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी मेंदूचं निरीक्षण करण्यासाठीच्या प्रयोगानिमित्त एखाद्या गुहेत सर्वाधिक काळ वास्तव्य करण्याचा विश्वविक्रम तिनं मोडला.

ती गुहेत असतेवेळी अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घटना घडल्या. युक्रेन- रशिया युद्ध, कोविड, मास्कबंदी, जागतिक लॉकडाऊन, ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन या सर्व घटना जगभरात घडल्या होत्या. फ्लॅमिनी मात्र एका वेगळ्याच दुनियेत जगत होती.

इतके दिवस गुहेत केलं तरी काय?

एखादा धओका जाणवल्यास फ्लॅमिनीसाठी एक पॅनिक बटणही देण्यात आलं होतं. पण, तिनं कधीच या बटणाचा वापर केला नाही. दरम्यानच्या काळात तिनं इथं एक वेगळं विश्व तयार केलं होतं. या गुहेत ती, व्यायाम करत होती, चित्र काढत होती, लोकरी टोप्या विणत होती. तिनं गुहेत प्रवेश केल्या क्षणापासून अखेरच्या दिवसापर्यंत 60 पुस्तकं वाचली. फ्लॅमिनीनं तिचा हा प्रवास चित्रीत करण्यासाठी सोबत 2 गो प्रो कॅमेरा नेले होते. इथं तिला साधारण 1 हजार लिटर इतक्या पाण्याची गरज लागल्याची माहिती संबंधित सदस्यांनी दिली.

Athlete spent 500 days in a cave for human experiment see photos
छाया सौजन्य- रॉयटर्स 

हेसुद्धा वाचा : Ancient Temple: इटलीत समुद्राच्या तळाशी सापडले प्राचीन मंदिर; रहस्य जाणून शास्त्रज्ञही झाले अचंबित

तिचा हा गुहेतील प्रवास फारसा सोपा नव्हता. आरोग्यदायी खाण्यापासून स्वत:शीच साधलेल्या संवादामुळं ती समृद्ध झाली होती. या साऱ्यामध्ये तिला महत्त्वाच्या गोष्टींचा पुरवठा करण्यापासून गुहेतील टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्याची काळजी तिच्या टीमनं घेतली होती. यादरम्यान भीती वाटणं स्वाभाविक होतं, पण तुम्ही तुमच्या भावनांना आवर घालत आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नये असं म्हणत तिनं हा संदेश दिला. या साऱ्यामध्ये फ्लेमिनी गुहेत असतेवेळी मानसोपचार तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्रशिक्षक या सर्व मंडळींनी तिच्या हालचालींचं निरीक्षण करत समाजाच्या गोंधळातून एकटं राहिल्यास वेळ, झोप आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला.